Rani Mukherjee first reaction after national award  Instagram
मनोरंजन

Rani Mukherjee | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतला मोठा निर्णय

Rani Mukherjee - ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’साठी राणीचा सन्मान; घेतला मोठा निर्णय

स्वालिया न. शिकलगार

Rani Mukherjee first reaction after national award

मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जीला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तिच्या मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे (२०२३) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिने जिंकला. तिने ३० वर्षांहून अधिक सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. या पुरस्कारानंतर ती भावूक झाली. यावेळी माध्यमांशी तिने संवाद साधला.

पुरस्कार मिळाल्यानंतर काय म्हणाली राणी मुखर्जी?

ती म्हणाली, "मी माझ्या नवीन ऑफिससाठी गृहप्रवेश पूजा करत होते. माझे वडील राहत होते, ते त्या ठिकाणीच आहे. दिवसभर मी वडिलांचा विचार करत होते. पूजा संपवली आणि मी बसता क्षणी फोन आला. राष्ट्रीय पुरस्कार मिळणार हे ऐकून खरोखर वाटले की, हे माझ्या वडिलांचे आशीर्वाद होते. मी त्याच खोलीत पूजा करत होते जिथे त्यांचे निधन झाले होते."

'मी खरंच भारावून गेले आहे. हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे. आणि मी तो माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण करते, ज्यांनी नेहमी या क्षणाचे स्वप्न पाहिले होते. आज त्यांची खूप आठवण येतेय.'

Rani Mukherjee

राणीने पुरस्कार मिळाल्यानंतर मोठा निर्णय घेतला. ती म्हणाली- 'हा सन्मान जगातील सर्व मातांना अर्पण केला.' ''मिसेज चॅटर्जी वर्सेज नॉर्वे ही कथा मला एका आईच्या न थांबणाऱ्या लढ्याची कहाणी आहे, जी आपल्या मुलासाठी प्रत्येक संकटाचा सामना करते. ती म्हणाली की, आई म्हणून या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही मातृत्वाच्या शक्तीला सन्मान द्यायचा प्रयत्न केला आहे.''

राणी मुखर्जीने मानले आभार

राणी मुखर्जीने आपल्या सर्वांचे आभार मानले. ती म्हणाली, “फॅन्स माझ्या सुख-दुःखात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं प्रेम आणि साथ ही माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. हा पुरस्कार तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला आनंद होताना पाहून मलाही आनंद होतोय.” कोविडच्या कठीण काळात जर टीमने मनापासून मेहनत केली नसती तर ही फिल्म कधीच शक्य झाली नसती, असेही तिने नमूद केले.

त्याचबरोबर राणीने दिग्दर्शिका असीमा, निर्माते निखिल, मोनिषा, मधु, एस्टोनिया आणि भारतातील कलाकार व तांत्रिक टीमचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT