Shamshera Trailer  
मनोरंजन

Shamshera Trailer : रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा ट्रेलर रिलीज; संजय दत्तची भयावह क्रूरता

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री वाणी कपूरचा आगामी 'शमशेरा' लवकरच भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटातील कलाकारांचे एकाहून एक हॉट लूक समोर येत आहेत. याआधी गेल्या आठवड्यात शमशेरा चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर सध्या या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरने (Shamshera Trailer) धुमाकूळ घातला आहे. यामुळे रणबीरच्या चित्रपटाची आतुरतेने चाहते वाट पाहत आहेत.

यशराज फिल्मच्या बॅनरखाली बनलेल्या आणि अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी 'शमशेरा' या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपटात रणबीर कपूर, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री वाणी कपूर या दिग्दज स्टार्सच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे नवनविन कलाकारांचे लूक समोर येत आहेत. 'शमशेरा' मधील धमाकेदार लूक पाहून चाहत्याना चित्रपटाची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.

याच दरम्यान आगामी 'शमशेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर (Shamshera Trailer) रिलीज करण्यात आला आहे. यात पहिल्यांदा १८७१च्या इग्रजांच्या जुलमी राजवट दाखवण्यात आलं आहे. यानंतर रणबीरच्या काही गुप्त हालचाली, अॅक्सीन सीन, घोडेस्वारी, काही रोमॉटिक सीन, लढाई यासारखे बरंच काही दाखवण्यात आलं आहे. यातील खास म्हणजे, संजय दत्तने भयंकर क्रूर पोलिसाच्या भूमिकेत दिसला आहे. या ट्रेलरमध्ये काही वेळा रणबीर लहान मुलांच्यासोबतही दिसला आहे. हा व्हिडिओ YRF युट्यूब चॅनेलवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यानी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया देत कौतुक केले आहे. तर 'शमशेरा' चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांना चित्रपटात रणबीर कपूरची दुहेरी भूमिका आहे काय? असा प्रश्न पडला आहे. हा चित्रपट २२ जुलै २०२२ रोजी सिनेमा घरात येत आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT