मनोरंजन

Ramesh Deo : रमेश देव अनंतात विलीन

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे बुधवारी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज गुरूवारी विलेपार्ले पूर्व परिसरातील पारसी वाडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. रमेश देव यांच्या पार्थिवाचे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसोबत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन घेतले.

रमेश देव (Ramesh Deo) यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९५० मध्ये केली असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दिग्गज भूमिका साकारल्या आहेत. रमेश देव यांनी २८५ हिदी चित्रपट, १९० मराछी चित्रपट आणि ३० हून अधिक नाटकात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

'आनंद', 'घराना', 'सोने पे सुहागा', 'गोरा', 'मिस्टर इंडिया', 'कुदरत का कानून', 'दिलजला', 'शेर शिवाजी', 'प्यार किया है प्यार करेंगे' हे हिंदी चित्रपट तर आंधळा मागतो एक डोळा, भिंगरी, एक धागा सुखाचा, जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे या मराठी काम केलं आहे. हे चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिकेवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे.

रमेश आणि सीमा देव यांचे १९६३ मध्ये लग्न झाले. त्यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव अशी दोन मुले आहेत. अजिंक्य देव कलाकार तर अभिनय देव हे दिग्दर्शक आहेत. अभिनय यांनी दिल्ली-बेल्लीचं या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT