Ramayana teaser out now  pudhari
मनोरंजन

Ramayana teaser | रणबीरचा 'प्रभू राम' अवतार पाहून करण जोहर थक्क; हृतिक रोशनची पहिली प्रतिक्रिया व्हायरल!

Ramayana - रणबीरचा प्रभू राम अवतार पाहून करण जोहर थक्क; हृतिक रोशनची पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल!

स्वालिया न. शिकलगार

हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर निर्मात्यांनी 'रामायण' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. रणबीर कपूरच्या 'प्रभू राम' यांच्या भूमिकेत आहे. हा टीझर पाहून बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Ramayana teaser released

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाचा टीझर आज, २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूरचा प्रभू रामाच्या रूपातील लूक पाहून सिनेसृष्टीसह प्रेक्षकही थक्क झाले आहेत.

बिग बजेट हा चित्रपट नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. 'रामायण' चित्रपटाचा टीझर आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत पहिल्यांदाच समोर आला आहे. त्याचा हा अवतार पाहून प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे सुरु केले आहे.

सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया:

टीझर प्रदर्शित होताच बॉलिवूडचा करण जोहरने इन्स्टाग्रामवर आपली प्रतिक्रिया शेअर केली. तो म्हणाला, "मी आता वाट पाहू शकत नाही! रणबीर कपूरने प्रभू राम यांची भूमिका अत्यंत भक्तीभावाने आणि पवित्रतेने साकारली आहे. त्याचे नाव ऐकल्यावर तो ज्या पद्धतीने मागे वळून पाहतो, ते या टीझरचे मुख्य आकर्षण आहे. हे खरोखरच 'spectacular' (अद्भूत) आहे."

बॉलीवूडचा 'ग्रीक गॉड' हृतिक रोशन यानेही रणबीरच्या या नव्या रूपाचे कौतुक केले आहे. आलिया भट्टने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करताना हृतिकने "Oh my god!! Insane!! Love it!!" असे लिहिले आहे.

रामायण - वाराणसी

रिपोर्टनुसार, बजेट बद्दल बोलायचं झालं तर रामायणचे बजेट ४००० कोटी आहे. तर वाराणसीचे १३०० कोटींचे बजेट आहे. वाराणसीचे टीजर हैदराबादमध्ये खुल्या मैदानात प्रदर्शित करण्यात आले तर रामायणची पहिली झलक अमेरिकेतील लॉस एंजिल्समध्ये रिलीज करण्यात आलं.

रणबीर कपूरचा हा नवा लूक व्हायरल होतोय. चालणे, त्याचे ॲटिट्यूड यासाठी त्याने मेहनत घेतलेली दिसते. वाराणसी मध्ये महेश बाबूला बैलाची सवारी करताना दाखवण्यात आलं आहे.

रामायण दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग २०२७ मध्ये येईल. या चित्रपटात रणबीर कपूर - प्रभू राम, साई पल्लवी- माता सीता, यश- रावण, सनी देओल- हनुमान आणि रवी दुबे - लक्ष्मणाच्या भूमिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT