Ramayana star cast  Instagram
मनोरंजन

Ramayana | रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये जटायू कोण साकारणार? नवीन अपडेट समोर

अमिताभ बच्चन नव्हे तर 'जटायू'साठी 'या' अभिनेत्याचे नाव समोर, Ramayana ची स्टार कास्ट पाहा

पुढारी वृत्तसेवा

नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित रामायण चित्रपटाची स्टार कास्ट सातत्याने चर्चेत आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश आणि सनी देओल यांच्यासह अनेक कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. जटायूच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांचे नाव दीर्घकाळ चर्चेत असले, तरी काही नव्या चर्चांमुळे दुसऱ्या अभिनेत्याच्या नावाचीही चर्चा रंगली आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्क - नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिला भाग दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी निर्माते ट्रेलर लाँच करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, रिलीजपूर्वीच ट्रेलर सोशल मीडियावर लीक झाला आणि मोठी चर्चा रंगली.

ट्रेलरची झलक समोर आल्यानंतर चित्रपटातील कलाकारांच्या लूकची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यशच्या रावणाच्या अवताराने प्रेक्षकांचे अधिक लक्ष वेधून घेतले आहे. माता सीता, हनुमान यांच्यानंतर जटयूच्या भूमिकेसाठी एका दिग्गज अभिनेत्याचे नाव समोर आले आहे.

'रामायण' चित्रपटाची स्टारकास्ट जवळपास निश्चित झाली आहे. काही महत्त्वाच्या भूमिकांबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. नुकतेच महादेवाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव समोर आल्यानंतर आता जटायूच्या भूमिकेबाबतही मोठी माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन जटायूच्या पात्राला आवाज देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नव्या माहितीनुसार या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले जात आहे.

जटायूला अनुपम खेर देणार आवाज?

रिपोर्टनुसार, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर 'रामायण'मधील जटायू या महत्त्वाच्या पात्रासाठी आवाज देणार आहेत. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

रावण आणि जटायूमधील युद्ध

'रामायण'मध्ये यश साकारत असलेल्या रावण आणि जटायू यांच्यातील संघर्ष हा चित्रपटातील महत्त्वाचा प्रसंग असणार आहे. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या दृश्याबाबत भाष्य करताना, रावण आणि जटायू यांच्यातील युद्ध पडद्यावर किती भव्य आणि भावनिक पद्धतीने साकारले आहे, याचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतरच येईल, असे सांगितले.

दोन भागांत प्रदर्शित होणार 'रामायण'

निर्माते नमित मल्होत्रा आणि अभिनेता यश यांच्या सहनिर्मितीत साकारत असलेला 'रामायण' हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. सुमारे ४,००० कोटी रुपयांच्या बजेटसह तयार झालेल्या या चित्रपटाचा पहिला भाग यंदाच्या दिवाळीत, तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार आहे.

'रामायण'ची प्रमुख स्टारकास्ट

रणबीर कपूर - प्रभू श्रीराम

साई पल्लवी - माता सीता

यश - रावण

रवी दुबे - लक्ष्मण

रकुल प्रीत सिंह - शूर्पणखा

अरुण गोविल - राजा दशरथ

लारा दत्ता - कैकेयी

सनी देओल - हनुमान

विवेक ओबेरॉय - विद्युतजीव

काजल अग्रवाल - मंदोदरी

शोभना - कैकसी

कुणाल कपूर - इंद्रदेव

शीबा चड्ढा - मंथरा

इंदिरा कृष्णन - कौशल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT