Box Office Day 17 : ‘रामायण’ची कमाई ९०० कोटींच्या पार; आणखी एक मोठा विक्रम नावावर! file photo
मनोरंजन

Box Office Day 17 : ‘रामायण’ची कमाई ९०० कोटींच्या पार; आणखी एक मोठा विक्रम नावावर!

‘रामायण’ चित्रपटाला प्रदर्शित झाल्यापासून समीक्षक आणि चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. मात्र, रावणाच्या भूमिकेत असलेल्या यशने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे.

पुढारी वृत्तसेवा

ramayana box office collection day 17 nitesh tiwari ranbir kapoor yash sai pallavi film enterd in 900 cr know saturday

पुढारी ऑनलाईन : Ramayana Box Office Collection Day 17 : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा २०२६ मधील बहुप्रतीक्षित चित्रपट ठरला आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाला केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. दररोज नवे विक्रम रचणाऱ्या या चित्रपटावर देश-विदेशातील प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.

चित्रपटात रणबीर कपूरने साकारलेली प्रभू श्रीरामाची भूमिका आणि यशने साकारलेली रावणाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ‘रामायण’ गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता चित्रपटाच्या १७ व्या दिवसाच्या म्हणजेच शुक्रवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. चला तर जाणून घेऊया, या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे.

‘रामायण’ने रचला नवा विक्रम

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाला प्रदर्शनानंतर समीक्षक आणि चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटातील प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरला प्रेक्षकांनी पसंती दिली. मात्र, रावणाच्या भूमिकेतील यशने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले.

पहिल्याच दिवशी रणबीर कपूरच्या ‘रामायण’ने तब्बल ६४.८५ कोटी रुपयांची दमदार कमाई केली होती. आता चित्रपटाच्या १७ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. Sacnilk च्या अहवालानुसार, ‘रामायण’ने १७ व्या दिवशी २७.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह भारतातील चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ९०६.९० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे या चित्रपटाने ९०० कोटींचा टप्पा पार करत आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

‘रामायण’ चित्रपटातील कलाकार कोण?

‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय लारा दत्ता, अरुण गोविल आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दोन भागांमध्ये तयार करण्यात आलेली ही भव्य महागाथा हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट IMAX मध्येही प्रदर्शित करण्याची योजना आहे. ‘रामायण’चा पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या लेखातील बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे विविध मीडिया रिपोर्ट्स, ट्रेड विश्लेषक आणि सूत्रांच्या माहितीवर आधारित आहेत. प्रत्यक्ष आकडे दिलेल्या अंदाजापेक्षा वेगळे असू शकतात. या आकडेवारीच्या अधिकृततेची पुष्टी करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT