

Solapur Drought : आर्ची परशाची अस्सल ग्रामीण बाज असलेली लव्ह स्टोरी म्हणजे सैराट चित्रपट, नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेले हा चित्रपट मराठीतील माईलस्टोन ठरला. २०१५ साली आलेल्या या चित्रपटाने मराठी समाजमनावर गारुड केले होते. पहिलाच१०० कोटींचा मराठी चित्रपट ठरला होता.चित्रपटातील छायाचित्रण, संगित हे आजही लोकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बहुतांश हे सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात झाले होते. यातील याड लागल या गाण्यात आर्ची ज्या विहिरी पोहायला येते ती विहिरी येथीलच. ही विहिर पुन्हा आता प्रकाशझोतात आली आहे ते दुष्काळामुळे.
यंदा दुष्काळाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत सोलापूरातील अनेक तालुके होरपळत आहेत.विहीरी नाले नोव्हेंबरमध्येच आटले आहेत. करमाळा तालुक्यातील देवळाली येथील ही बारव आताच पूर्णपणे तळाला गेली आहे, ही विहीर १९७२ च्या दुष्काळात बांधण्यात आली होती. ती पुन्हा २०२६ च्या दुष्काळात विहीरने तळ गाठला. या विहीरीला पाणी मुबलक आहे पण यंदा दुष्काळाच्या झळा इतक्या तिव्र आहेत की नोव्हेंबरमध्येच ही कोरडी पडली आहे. ५४ वर्षात पहिल्यांदाच विहीर कोरडी पडली आहे.
तुळशीराम राखुंडे यांनी १९७२ च्या दुष्काळात पाण्यासाठी ही विहीर खोदली होती. जवळपास ४० फूट खोल व तेवढीच ही रुंद आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची पीके याच विहिरीच्या पाण्यावर आहेत. पिण्याच्या पाण्यासाठीही याचा चांगला उपयोग होते पण आता विहीरीने तळ गाठल्याने पाण्यासाठी वणवण होण्याची शक्यता आहे. अनेकांचा आधार असणाऱ्या या विहिरीची अवस्था पाहता यंदाच्या दुष्काळाची दाहकता किती गंभीर आहे, याची जाणीव होते.
२०१५ सालच्या सैराट चित्रपटात आर्ची परशा यांच्यातील पोहण्याचा प्रसंग याच विहीरीत चित्रीत झाला होतो. तसे अजय अतूल यांच्या श्रवणीय संगीताची जादू या गाण्यात दिसून आली. परशा व लंगड्या यांच्यासह मित्रपरिवार या विरीरील पाण्यात पोहताना दाखवले होते. यानंतर ही विहीर चांगलीच प्रसिद्ध झाली होती.
दरम्यान, सोलापूरला यंदा चांगलाच दुष्काळाचा फटका बसण्याची शक्यता आहे भूजल पातळीत मोठी घट झाली असून, त्याचा गंभीर फटका शेती व्यवसायाला बसत आहे. माढा तालुक्यातील ८० टक्के शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः धडपड सुरू असून, पाण्याअभावी उभी पिके वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.