Rakhi Sawant Defends Govinda Pudhari
मनोरंजन

Rakhi Sawant: ‘गोविंदासोबत मी अनेकदा बंद खोलीत एकटी होते, पण त्याने मला...’; राखी सावंतने सांगितला थक्क करणारा अनुभव

Rakhi Sawant Defends Govinda: गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता राखी सावंतने गोविंदाची बाजू घेतली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Rakhi Sawant Defends Govinda: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता अभिनेत्री आणि ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतची एन्ट्री झाली आहे.

गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, राखीने गोविंदाबाबत एक मोठा दावा केला आहे. आपण अनेकदा गोविंदासोबत एका खोलीत एकटी असतानाही त्याने कधीही आपल्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले नसल्याचे राखीने म्हटले आहे.

गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. सुनीताने घटस्फोटासाठी अर्ज केला होता, मात्र तो नंतर मागे घेतल्याचे समोर आले. हा अर्ज नेमका का मागे घेण्यात आला, याबाबत सुनीताने सविस्तर माहिती दिलेली नाही.

या सगळ्या प्रकरणात राखीने गोविंदाची बाजू घेतल्याचे दिसत आहे. पापाराझींशी बोलताना राखीने गोविंदाच्या स्वभावाबद्दल आपला अनुभव सांगितला. ती म्हणाली की, अनेक वेळा ती गोविंदासोबत एकटी एका खोलीत होती. चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान, विविध शो आणि इतर कार्यक्रमांमुळे दोघे अनेकदा एकत्र वेळ घालवत होते. मात्र, या काळात गोविंदाने कधीही तिच्याशी गैरवर्तन केले नाही किंवा चुकीच्या नजरेने पाहिले नाही, असा दावा राखीने केला.

राखीच्या म्हणण्यानुसार, गोविंदासोबत भेटीगाठी, जेवण आणि कामानिमित्त अनेक प्रसंग आले. मात्र, प्रत्येक वेळी गोविंदाचे वर्तन अत्यंत सन्मानपूर्वक होते. त्यामुळे त्याच्याबाबत सध्या होत असलेल्या काही आरोपांवर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गोविंदा हा चांगला व्यक्ती असून सुनीताही चांगली व्यक्ती असल्याचे सांगत, पती-पत्नीच्या नात्यात निर्माण झालेल्या वादामागे नेमके काय कारण आहे, असा प्रश्नही राखीने उपस्थित केला.

राखीने यावेळी आपल्या खास शैलीत गोविंदाचे समर्थन केले. गोविंदावर चुकीचे आरोप केले जात असल्याचे तिचे म्हणणे आहे. गोविंदाने कधीही आपल्याशी चुकीचे वर्तन केले नाही, मग त्याच्याबाबत अशा प्रकारच्या चर्चा का सुरू आहेत, असा सवालही तिने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT