मनोरंजन

Rakhi Sawant: राखी मोदींना म्हणते, ‘अमेरिकेहून माझ्यासाठी काहीतरी आणा’

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौर्‍यावर असून नुकतेच त्‍यांनी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली आहे. याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक  भेटवस्तू मागितली आहे.

राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमी या ना त्या कारणाने नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती आपले हॉट फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौर्‍यावर आहेत. याच दरम्यान राखीने स्वत: साठी अमेरिकेतून काही खास गोष्ट आणण्याची मागणी त्याच्यांकडे केली आहे.

राखीला सध्या मोंदीजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असल्याने त्यांना काय संदेश देशील? असे विचारण्यात आले. याचे उत्तर देताना राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींजी अमेरिका दौर्‍यावर गेले आहेत. ते आपल्या देशाला खूप पुढे नेत आहेत. ते देशात नवनवीन संकल्पना राबवित आहेत. आपल्या देशाची प्रगती करत असल्याचे तिने म्हटलं आहे.

राखीने मोदींकडे खास मागणी केली

याशिवाय तिने पुढे नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या मागण्या मांडण्यास सुरूवात केली. राखीने पहिल्यांदा अमेरिकेतील भारतीयांसाठी 'तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूपसारे प्रेम' असे म्हणत खास संदेश दिला.

यानंतर एवढ्यावर न थांबता राखीने पीएम मोदींकडे स्वतःसाठी शॉपिंग करण्याची मागणी केली. यात तिने माझ्यासाठी अमेरिकेत काय चांगले मिळते ते तेथून घेवून येण्याची विनंती केली आहे. याशिवाय तिने अमेरिकेतील काही डॉलरदेखील आणण्याची मागणी केली आहे.

याआधी राखीने 'बिग बॉस ओटीटी'च्या सेटच्या रस्त्यावर आपल्या कुत्रे चावल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओने ती यावेळी खूपच चर्चेत आली होती.

हेही वाचलंत का? 

(video: bollywoodpap and viralbhayani instagram वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT