पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या ( Rajinikanth ) चाहत्यांसाठी आनंदाचे वृत्त समोर आले आहे. रजनीकांत ( Rajinikanth ) यांच्यावर कॅरोटीड आर्टरी रीव्हस्क्युलरायझेशनच्या (Cartoid Artery Revascularisation) सर्जरीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
नुकतेच रजनीकांत यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत सुखरूप घरी परतल्याची माहिती दिली आहे. या फोटोत रजनीकांत आपल्या घराच्या दरवाज्याजवळ पाठमोरे उभे असल्याचे दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी 'Returned home ?' असे म्हटले आहे. यावरून ते सर्जरीनंतर सुखरूप घरी परतले असल्याचे समजते. यामुळे रजनीकांतच्या चाहत्यांत्या आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रजनीकांत यांची तब्येत बिघडल्याने गेल्या गुरुवारी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांची माहिती रजनीकांत यांनी स्वत : सोशल मीडियावर दिली होती. चेन्नईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते काल घरी परतले आहेत. याशिवाय त्यांचा बंगल्याच्या खाली गाडीतून उतरताना ते स्पॉट झाले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
याआधी गेल्याच आठवड्यातच त्यांना दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 'दादासाहेब फाळके' या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय डिसेंबर २०२० मध्ये रजनीकांत यांना हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना श्वासोच्छवासाचा आणि बिपीचा त्रास होत होता. यातून ते बरे झाले होते.
रजनीकांतच्या तब्येत सुधारून ते लवकर बरे होण्यासाठी अनेक चाहत्यांनी तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील थिरुपंकेंद्रम मुरुगन मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले होते. यावेळी चाहत्यांनी १०८ नारळ फोडून आणि 'मन सोरू' (फरशीवर ठेवून अन्न खाने) विधी करून विशेष पूजा केली होती. याशिवाय पूजेदरम्यान त्याच्या आगामी अन्नाथे' चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थनाही करण्यात आली होती.
रजनीकांत यांन अनेक हिंदी आणि तमिळ सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. त्यांचा आगामी 'अन्नाथे' हा तमिळ चित्रपट ४ नोव्हेंबर २०२१ रोजी रिलीज होणार आहे.
हेही वाचलंत का?