सुपरस्टार रजनीकांत यांचा 75वा वाढदिवस आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. पीएम मोदी, एम.के. स्टॅलिन, धनुष, खुशबू सुंदर आणि अनेक दिग्गज कलावंतांनी त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Rajinikanth 75th Birthday best whishesh
सुपरस्टार रजनीकांत यांचा आज ७५ वा वाढदिवस. लाखो फॅन्स, राजकीय नेते, चित्रपट इंडस्ट्रीतील दिग्गजांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी जुने फोटो, जुन्या आठवणी सोशल मीडियावरवर #HappyBirthdaySuperstarRajinikanth असे हॅशटॅग वापरून शेअर केले. खास बाब म्हणजे पंतप्रधान मोदी, एम के स्टॅलिन, अभिनेता धनुष, खुशबू सुंदर यांनी एक्स अकाऊंटवर फोटो ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत ट्विटद्वारे शुभेच्छा पाठवल्या. रजनीकांतजी, तुम्ही भारतीय कलाक्षेत्राचा अभिमान आहात. तुमचे आयुष्य निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो, असे म्हटले आहे.
सीएम स्टॅलिन यांचा अभिनंदन संदेश
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडियावर रजनीकांत यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "रजनीकांत वयाच्या पलीकडे असलेले आकर्षण!..माझ्या मित्राला, सुपरस्टार रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..."
अभिनेत्री, राजकीय नेत्या खुशबू सुंदर यांनीही रजनीकांत यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला. भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव सुपरस्टार, rajinikanth यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
धनुषने एक्स अकाऊंटवर लिहिले... "हॅप्पी बर्थडे." धनुष हा रजनीकांत यांचा एक्स जावई आहे. त्याने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याशी लग्न केले होते. पण त्यांचे नाते संपुष्टात आले.
इतर अनेक सेलिब्रिटी, रजनीकांत यांचे सहकलाकार, दिग्दर्शक, संगीतकार आणि साऊथ स्टार्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरील फोटो, व्हिडिओ, मोमेंट्स रजनीकांत यांच्या आठवणींनी त्यांचा वाढदिवस खरा अर्थाने साजरा झाला.