मनोरंजन

rajeshwari kharat: राजेश्वरी खरातचे मॉडर्न फोटो व्हायरल

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात (rajeshwari kharat) घराघरात पोहोचली आहे. या संपूर्ण चित्रपटात तिला डायलॉग नाही. तिने एका शाळकरी मुलगी (शालू) ची भूमिका साकारली आहे. 'फँड्री' चित्रपटात साधी दिसणारी शालू आता मात्र, ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. शालू म्हणजे, राजेश्वरी खरात (rajeshwari kharat) मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे.

राजेश्वरी खरातने नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर नवनवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शालू मॉडर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहे. ती या फोटोत काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.

हा लूकने शालूच्या सौंदर्यात आणखी खुलले आहे. सोशल मीडियावर राजेश्वरीने आपल्या सुंदरतेच्या आणि मादक अदाकारीच्या जोरावर फॉलोअर्स संख्या ही एखाद्या प्रस्थापित सेलिब्रिटीही मागे पडतील इतकी वाढविलेली आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच कॉमेंन्टचा पाउस पडत आहे. यात एकाने 'शालू तुझे कपडे खूपच छान असून तू सुंदर दिसत आहेत'. तर दुसऱ्याने एकाने 'या पावसात तू आग लावलीस' अशा हटके कॉमेंन्ट लिहिल्या आहेत.

याशिवाय आणखी एकाने 'सौंन्दर्याची खान', 'सुंदर', 'मस्त', 'ग्लॅमरस' अशा कॉमेन्टस केल्या आहेत. या फोटोंच्या कॉमेंन्टससोबत चाहत्यांनी प्रेमाचा आणि फायर ईमोजीदेखील शेअर केला आहे. चाहत्यांना राजेश्वरीला बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

याआधाही राजेश्वरी खरातने आपले हटके फोटो शेअर करत सोशल मीडियात धुमाकूळ घातला होता. राजेश्वरीने घातलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेसने चाहत्यांना भूरळ पडली आहे.

'फँड्री' चित्रपटानंतर राजेश्वरीने आयटमगिरी चित्रपटात काम केले आहे. सध्या राजेश्वरी पुण्यात राहते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT