रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक चित्रपट थिएटरमध्ये यशस्वी ठरल्यानंतर आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित हा चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांना OTT वर पाहता येत आहे.
रितेश देशमुख यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक असलेला 'राजा शिवाजी' आता OTT प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. थिएटरमध्ये दमदार कमाई आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवल्यानंतर हा ऐतिहासिक चित्रपट आता नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता आला नव्हता, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेश देशमुखने अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित या चित्रपटात त्यांच्या धाडसी निर्णयांचा, संघर्षाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचा भव्य सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळतो.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या भव्य सेट्स, युद्धदृश्ये, संगीत, छायांकन आणि कलाकारांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटांपैकी एक मानल्या गेलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशानंतर चित्रपटाच्या OTT प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.
आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यामुळे भारतासह जगभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. 'राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत.
रितेश देशमुखचा भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ सिनेमागृहात प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि अपेक्षेपेक्षा चांगली कमाई करत चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
बॉक्स ऑफिसवर कमाई
७५ कोटी रुपयांच्या बजेट असणाऱ्या या चित्रपटाने जगभरात एकूण १३० कोटींचे कलेक्शन केले असून यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी चित्रपट बनला आहे. ‘राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन, विद्या बालन, अमोल गुप्ते, भाग्यश्री पटवर्धन, सलमान खान अशा दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.