Raja Shivaji Box Office Collection: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखचा ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 25 दिवसांत कमाईचे नवे विक्रम केले आहेत. मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, कमाईसोबतच अनेक मोठे रेकॉर्डही या चित्रपटाच्या नावावर झाले आहेत.
चित्रपटात रितेश देशमुखसोबत जेनेलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि विद्या बालन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, सलमान खानचा कॅमिओही चित्रपटात पाहायला मिळतो.
रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच ‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड ठेवली आहे. चौथ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई दमदार सुरू आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या 24 दिवसांत भारतात ₹101.4 कोटींची कमाई केली आहे.
या कामगिरीसह ‘राजा शिवाजी’ने मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. भारतात ₹100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
‘राजा शिवाजी’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹100 कोटींचा आकडा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा अध्याय लिहिला आहे. आतापर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाला ही कामगिरी करता आली नव्हती.
सैराट’ या सुपरहिट चित्रपटाने जवळपास ₹90 कोटींची कमाई केली होती. मात्र ‘राजा शिवाजी’ने हा रेकॉर्ड मोडत मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होण्याचा मान पटकावला आहे.
3. जगभरात ₹114 कोटींची कमाई
भारतातच नव्हे तर परदेशातही ‘राजा शिवाजी’ची जोरदार क्रेझ दिसून आली. या चित्रपटाने जगभरात ₹114 कोटींपेक्षा अधिक कमाई करत मराठी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याचा विक्रम केला आहे.
हा चित्रपट रितेश देशमुखच्या कारकिर्दीतील 10वा ₹100 कोटी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, याआधीचे त्याचे 9 चित्रपट हे बॉलिवूडमधील मल्टिस्टारर व्यावसायिक सिनेमे होते. स्वतः दिग्दर्शित केलेल्या प्रादेशिक चित्रपटातून ही कामगिरी करणे ही त्याच्यासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
‘राजा शिवाजी’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ₹11.7 कोटींची कमाई केली होती. यासह तो मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला.
एकंदरीत, ‘राजा शिवाजी’ने केवळ कमाईच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक जुने विक्रम मोडत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. आता हा चित्रपट आणखी कोणते विक्रम मोडतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.