Raja Shivaji Collection Day 6 Pudhari
मनोरंजन

Raja Shivaji Box Office: 6 दिवसांत 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या बजेटचा निम्मा खर्चही वसूल झाला नाही; किती कमाई केली?

Raja Shivaji Collection Day 6: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने 6 दिवसांत सुमारे 48.65 कोटींची कमाई केली आहे. 100 कोटींच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटाचं अजून अर्धंही कलेक्शन झालं नाही.

पुढारी वृत्तसेवा

Raja Shivaji Collection Day 6: रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा भव्य ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांमध्ये चांगली उत्सुकता निर्माण करत होता. चित्रपटात स्टारकास्टही दमदार असूनही बॉक्स ऑफिसवर अपेक्षित जादू दिसत नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

चित्रपटाने सुरुवातीच्या तीन दिवसांत दमदार कमाई करत दररोज सरासरी सुमारे 11 कोटींची कमाई केली. मात्र, आठवड्याच्या पुढच्या तीन दिवसांमध्ये कमाईत मोठी घसरण झाली आणि ती सरासरी 5 कोटींच्या आसपास आहे. सहाव्या दिवशी चित्रपटाने 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सहा दिवसांत चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 48.65 कोटींवर पोहोचले आहे, तर ग्रॉस कलेक्शन सुमारे 57.70 कोटी रुपये झाले आहे.

सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने अजूनही आपल्या खर्चाच्या निम्मीही रक्कम वसूल केली नाही. ओव्हरसीज कलेक्शनमधूनही विशेष मदत मिळत नसल्याने चित्रपटासाठी पुढचा प्रवास आव्हानात्मक ठरणार आहे.

चित्रपटात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्याच्या सोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, भाग्यश्री, विद्या बालन आणि फरदीन खान यांसारखी मोठी कलाकार मंडळी आहेत. तसेच सलमान खानचा कॅमिओही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो.

मराठी पट्ट्यात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी हिंदीमध्ये मध्यम प्रतिसाद आहे. त्यामुळे 100 कोटींचा टप्पा गाठणे अशक्य नसला तरी कठीण नक्कीच आहे. आता दुसऱ्या विकेंडमध्ये चित्रपटाची कमाई वाढते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT