Raja Shivaji Box Office Collection Day 17 Pudhari
मनोरंजन

Raja Shivaji Box Office: ‘राजा शिवाजी’ने इतिहास रचला; रितेश देशमुखच्या सिनेमाने पार केला 100 कोटींचा टप्पा

Raja Shivaji Box Office Collection Day 17: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत भारतात 100 कोटी रुपयांच्या ग्रॉस कमाईचा टप्पा पार केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Raja Shivaji Box Office Collection Day 17: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही थिएटरमध्ये आपली पकड कायम ठेवली असून आता या सिनेमाने एक मोठा टप्पा गाठला आहे.

१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिसरा वीकेंड पूर्ण करताना १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अहवालानुसार, चित्रपटाचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन १००.०७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर नेट कलेक्शन ८४.५५ कोटी रुपये झाले आहे.

१७ व्या दिवशी किती कमाई?

१७ व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी ‘राजा शिवाजी’ने २,२२३ शोमधून ३.४५ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये हिंदीने ५५ लाख रुपये कमावले, तर मराठीने तब्बल २.९० कोटी रुपयांची कमाई केली. यावरून चित्रपटाला महाराष्ट्रात प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती. यामध्ये हिंदी व्हर्जनचा वाटा १६.४० कोटी रुपये, तर मराठीचा वाटा ३६.२५ कोटी रुपये होता.

दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने आणखी २४.३० कोटी रुपये कमावले. विशेष म्हणजे तिसऱ्या आठवड्यातही सिनेमाच्या कमाईत स्थिरता दिसत आहे.

कलाकारांनी फी घेतली नाही

‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल एक रंजक माहिती समोर आली आहे. या सिनेमात काम करणाऱ्या मोठ्या कलाकारांनी कोणतीही फी घेतलेली नाही.

एका मुलाखतीत रितेश देशमुखने सांगितलं की, “या चित्रपटातील सर्व मोठ्या कलाकारांनी मोफत काम केलं आहे. सर्वांनी महाराजांसाठी काम केलं.” या चित्रपटात केवळ अभिनयच नाही, तर कथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही रितेश देशमुखने सांभाळली आहे.

दमदार स्टारकास्ट

या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, सचिन खेडेकर, फरदीन खान, जेनेलिया देशमुख, भाग्यश्री आणि अमोल गुप्ते यांसारखे दिग्गज कलाकार झळकत आहेत.

याशिवाय जितेंद्र जोशी, मुस्ताक शेख, अशोक समर्थ आणि सुरेश विश्वकर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आगामी दिवसांत हा सिनेमा आणखी कोणते विक्रम मोडतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT