मनोरंजन

ऑपरेशन रोमियो चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर लॉन्च, तुम्ही पाहिला का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऑपरेशन रोमियो हा मल्याळम हिट चित्रपट "इश्क: नॉट अ लव्ह स्टोरी" चे हिंदी व्हर्जन आहे. ऑपरेशन रोमियो २२ एप्रिल, २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. ऑपरेशन रोमियो या हिंदी चित्रपटात शरद केळकर सोबत किशोर कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

'टॉयलेट-एक प्रेम कथा', 'रुस्तम' आणि 'नाम शबाना' यांसारख्या अभूतपूर्व हिट चित्रपटांनंतर नीरज पांडे ही नवी प्रेमकथा आणलीय. 'ऑपरेशन रोमियो' हा नीरज पांडे आणि शितल भाटिया यांचा सहावा चित्रपट आहे.

ही भारतातील तरुणांना उद्देशून असलेली एक कमालीची प्रेमकथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शशांत शाह यांनी केले आहे. 'ऑपरेशन रोमियो' देशभरातील तरुण जोडप्यांना नैतिक पोलिसिंगमुळे निर्माण झालेल्या धोक्यामुळे भेडसावणारी भीती अंतर्भूत करते. योगायोगाने, हा चित्रपट मूळ चित्रपट निर्माते अनुराज मनोहर यांच्या आयुष्यात घडलेल्या एका सत्य घटनेवरून प्रेरित आहे आणि यातूनच त्यांना 'इश्क' बनवण्याची प्रेरणा मिळाली.

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक संस्था म्हणून ओळखले जाणारे, नीरज पांडे हे चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांनी याआधी 'ए वेन्सडे', 'स्पेशल 26', 'एमएस' धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि समीक्षकांनी प्रशंसित अत्यंत यशस्वी थ्रिलर मालिका, 'स्पेशल ऑप्स' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

दिग्दर्शक शशांत शाह म्हणाले, "एक चित्रपट निर्माता म्हणून, मी ऑपरेशन रोमियोपेक्षा चांगले कथानक मागू शकलो नसतो. मी खरोखरच त्याच्या रिलीजची वाट पाहत आहे!

एका सत्य घटनेवर आधारित हा अनोखा ड्रामा थ्रिलर एक अशी कथा आहे जी जागतिक स्तरावर सर्व पिढ्यांना सांगणारा आहे, असे नीरज पांडे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT