मनोरंजन

Holi Special : प्रियांकाने निकसोबत केली रंगांची उधळण

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : देशात आणि परदेशात सध्या होळीची  ( Holi Special ) धामधूम सुरु आहे. मराठी कलाकारांपासून बॉलिवूडच्या स्टार्संपर्यत सर्वजण होळी सणाचा मनमुराद आनंद घेत आहेत. याच दरम्यान देसी गर्ल आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने परदेशात होळीचा आनंद लूटला. यावेळी प्रियाकासोबत पती निक जोनास आणि जोनास कुटुंबीय होळीच्या रंगाची उधळत करताना दिसले. या खास होळीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रियांकाने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर होळीचे ( Holi Special ) आपले काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये प्रियांकासह पती जोनास आणि कुटुंबियांनी होळीचा आनंद घेत रंगात न्हाऊन निघाले. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत प्रियांका आणि निक एकेमकांना रंग लावताना दिसत आहेत. यावेळी या कपलचा रोमँटिक लूकही पाहायला मिळाला.

प्रियांकाचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यात एका युजर्सने प्रतिक्रिया देताना 'प्रियांका देशी जोनस'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'होळी असावी तर अशी' असे म्हटले आहे. या व्हिडिओला काही मिनिटांत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

प्रियांका सध्या लॉस अँजेल्स, कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास असून ती हॉलिवूडमध्ये जाण्यास सज्ज झाली आहे. 'द मॅट्रिक्स' या चित्रपटात ती झळकली होती. प्रियांका आणि निकने १ डिसेंबर २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली. प्रियांका आणि निकने नुकतेच सरोगेसीद्वारे एका लेकीला जन्म दिला आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT