Marathi Actor Prashant Damle shared old and new tickets photos  Facebook
मनोरंजन

Prashant Damle | प्रशांत दामलेंनी शेअर केलं २३ वर्षांपूर्वीचे नाटकाचे तिकीट; युजर्स म्हणाले, तिकीट ५० वरून ५०० झालं, शेतमालाचे काय?

Prashant Damle | प्रशांत दामलेंनी २३ वर्षांपूर्वीचे नाटकाचे तिकीट आणि आताच्या तिकीटाचा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर कॉमेंट्सचा पाऊस पडतोय.

स्वालिया न. शिकलगार

Prashant Damle shared old and new tickets photos

मुंबई - मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केलीय. ही पोस्ट आहे, २३ वर्षांपूर्वीच्या नाटकाच्या तिकिटाची. दोन वेगवेगळे तिकिटाचे फोटो शेअर करत त्यांनी जुन्या नाटकाचे आणि नव्या नाटकाच्या तिकिटाचा फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट प्रशांत दामले यांच्या फेसबूकवर पाहता येईल.

प्रशांत दामलेंनी फेसबूक पोस्टमध्ये काय म्हटलंय?

दामलेंनी २ फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय- ''तिकिटावरची तारीख पहा.. 😍😍😍 कम्माल.. इतकी वर्ष तिकीट जपून ठेवल आहे.. धन्य झालो. मराठी नाटकात काम करतो.. अभिमान वाटतो.''

या पोस्टनंतर सोशल मीडिया युजर्सकडून कॉमेंट्सचा वर्षाव होतोय. या पोस्टला संमिश्र प्रतिक्रिया येताहेत. काहींनी याचा थेट संबंध शेतीमाल दराशी जोडला तर काहींनी खूप मिश्किलपणे विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फेसबूकवर सोशल मीडिया युजर्स काय म्हणाले?

या पोस्टवर एकापेक्षा एक कॉमेंट्सची रांग लागलीय. एका युजरने म्हटलं- तिकिटा वरची तारीख नाही हो तिकिटा वरची किमंत पहा. एक गोष्ट अभ्यास करण्यासारखी आहे. वर्ष 2002 मध्ये जे टीकिट 50 रुपयाला मिळायचे ते टीकट 2025 मध्ये 500 रुपयाला झाले. परंतु 2002 मध्ये शेतकर्यांच्या मालाला जो भाव होता तोच आहे. उदाहरणार्थ कापुस 5000 ते 6000 रुपये क्विंटल होता आज पण तोच भाव आहे. इथे बदल झाला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळात कोणीही कोणाचे आयकणार नाही डायरेक्ट हामले होतील. देश आरजकता च्या दिशेने वाटचाल करत आहे. आगोदरच सर्व ठरलेले आहे. कोणाला पटो नाही पटो हा देश अफगानिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका सारखा आरजकतेचा दिशेने वाटचाल करत आहे. कारण एक दिवस उद्रेक होणार आहे आणि तो उद्रेक हिंदू-मुस्लिम नसून गरीब-श्रीमंत होईल. हा शॉट काढुन ठेवा. जय जवान जय किसान.

अत्यंत मार्मिकपणे या कॉमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. सध्या शेतकरी ज्या शेतमालाल भाव मिळत नाही, म्हणून ज्या संकटातून जात आहे, त्याचे प्रतिबिंब अशा पद्धतीने सोशल मीडयावर उमटलेले दिसत आहे.

आणखी काही युजर्स, फॅन्सनी प्रशांत दामले यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. एकाने म्हटलंय- 'आज 23 वर्षानंतर ही नाटका त तोच ताजेपणा तोच जिवंतपणा आहे. एखाद्या कलाकाराने रंगभूमीवर साडे बारा हजारा पेक्षा जास्त प्रयोग करणे ही साधीसुधी गोष्ट नाही.' आणखी एकाने म्हटलंय- 2002/03 च्या दरम्यान मी सुद्धा एका लग्नाची गोष्ट पाहिले होते- रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे. अर्थात तिकीट सांभाळून ठेवलेले नाहीये. 😄, अशोक मामा नंतर काय त्यांच्या बरोबरीने म्हंटले तरी चालेल, इतका आवडणारा कलाकार म्हणजे प्रशांत दामले., कमाल तुमची आहे ... अशीच एनर्जी वाढती राहो प्रशांतजी ... सलाम तुम्हाला .

दुसऱ्या युजरने लिहिलंय- आपल्या अभिनयाची स्तुती करावी तेवढी थोडीच,खूप छान अभिनय करत आहात आपण.मला आपण केलेली नाटकं आणि चित्रपट खूप आवडतात. तिसऱ्या जुजरने म्हटलंय- तुम्ही आणि कविता दोघांच्यात ही फारसा बदल नाही.चिरतरुण . आणखी एका युजरने प्रतिक्रिया दिलीय की, 'प्रशांतजी, तुम्ही खूप छान कलाकार आहात. येणाऱ्या काळात तुम्हाला अधिक यश मिळो हीच शुभेच्छा. तुमचे मला सांगा, सुख म्हंजे काय असते हे गाणे खरोखरच तणाव कमी करणारे आहे. मी जेव्हा जेव्हा तणावात असतो तेव्हा मी हे गाणे नेहमीच ऐकतो.''

काहींनी उपहासात्मक विनोदी प्रतिक्रिया दिलीय. - ''दोन तिकिटांमध्ये 23 वर्षे अंतर आहे आणि किंमत म्हटली तर फक्त 1 शून्य वाढलेला आहे, परत 23 वर्षांनी जर हे नाटक आलं तर बाकी काही नाही फक्त तिकिटावर 2 शून्य वाढतील 😂''

'रंगीत टिकीट आहे‌ म्हणून Rs500..आणि काळं पांढरं Rs.50! ... काळं पांढरंच छापत जा.. लोकांचे Rs 450 वाचतील.'

तिकीट बारी वरचा इसम पण फारच रसिक मनाचा दिसतोय.. बदामाच्या आकाराचा "बी" लिव्हलाय...😍

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT