पुढारी ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टारर 'कल्कि 2898 AD' यावर्षीचा यशस्वी चित्रपट ठरला आहे. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरला. आता या चित्रपटाने आणखी एक नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.
वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर २५ दिवस पूर्ण करताच 'कल्कि 2898 AD' ने १ हजार कोटींचा कमाईचा आकडा गाठला आहे. प्रभास शाहरुख खान नंतर दुसरा असा अभिनेता बनला आहे, ज्याचे दोन चित्रपट १ हजार कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाले आहेत.
'कल्कि 2898 AD' ला २७ जून, २०२४ रोजी ५ भाषांमध्ये रिलीज करण्यात आलं होतं. यामध्ये कमाईच्या बाबतीत तमिळ चित्रपट सर्वाधिक पुढे आहे. नाग अश्विनच्या या चित्रपटाने २५ दिवसात भारतात ६१६.८५ कोटींची कमाई केली आहे. सोबत चौथ्या रविवारी एकूण कलेक्शन १००२.८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 'सरफिरा', 'इंडियन २', 'किल' आणि 'बॅड न्यूज' सारख्या अनेक रिलीजनंतर 'कल्कि 2898 AD' ने कमाईची गती थोडी कमी झाली आहे. पॅन इंडिया चित्रपट अद्यापही बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे.
'कल्कि 2898 एडी' वर्ल्डवाईड कलेक्शन २४ दिवसांत ९९०.९० कोटींचे होते. २५ दिवसात १००२.८० कोटी झाले. परदेशात २७० कोटींची कमाई केली. भारतात ग्रॉस कलेक्शन ७३२.८ कोटी रु. होतं.