'पिक्चर बॉईज' हा चित्रपट ग्लॅमर वर्ल्डचं स्वप्न पाहणाऱ्या दोन सामान्य तरुणांच्या प्रवासावर आधारित आहे. चित्रपट क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना हिरो बनण्यासाठी ते काय काय जुगाड करतात आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना खळखळून हसवतील. निलेशसिंह राजपूत यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, १५ मे पासून हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.
Picture Boyz Teaser out
'यंग ब्रिगेड'चा नवा कोरा आणि धमाल विनोदी चित्रपट 'पिक्चर बॉईज' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, अल्पावधीतच या टीझरने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. निलेशसिंह राजपूत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट येत्या १५ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
'पिक्चर बॉईज'ची कथा अशा दोन तरुणांभोवती फिरते, ज्यांना चित्रपट क्षेत्राची कोणतीही माहिती नाही, पण डोळ्यात मात्र 'हिरो' बनण्याचे मोठे स्वप्न आहे. अभिनयाची आवड आणि ग्लॅमर मिळवण्याची धडपड करताना या दोघांच्या आयुष्यात अनेक वळणे येतात. या प्रवासात त्यांना येणारे अनुभव आणि त्यातून निर्माण होणारे जबरदस्त विनोदी प्रसंग म्हणजे हा चित्रपट. टीझरवरून असे स्पष्ट दिसते की, उन्हाळ्याच्या सुट्टीत सहकुटुंब पाहण्यासारखा हा एक 'पैसा वसूल' चित्रपट असणार आहे.
तगडी स्टारकास्ट आणि खास आकर्षण या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे 'छोटा पुढारी' म्हणून प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडे. त्याच्यासोबतच प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, पवन चुरे, प्रिया तुळजापूरकर, सूरज पाटील, किरण पाटील, नम्रता पोटे, निभिया शर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत तपस्वी, मिलिंद दास्ताने, विजय खंदारे, साक्षी पंडित पवार, विजय गिते, अंकिता राऊत अशी नव्या जुन्या कलाकांची फळी चित्रपटात आहे.
त्रिमूर्ती फिल्म्सनं 'पिक्चर बॉईज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे.
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. एकूणच, उत्तम संवाद, दर्जेदार छायांकन आणि विनोदी कथानकामुळे 'पिक्चर बॉईज' यंदाच्या उन्हाळ्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी तयार आहे.