Ram Charan birthday gift movie Peddi First Look x account
मनोरंजन

Peddi Ram Charan First Look | हातात गदा अन् पिळदार शरीरयष्टी! राम चरणचा 'पेड्डी'मधील धाकड पैलवान लूक आऊट; वाढदिवशी चाहत्यांना मोठी भेट!

Peddi Ram Charan First Look - हातात गदा अन् पिळदार शरीरयष्टी! राम चरणचा 'पेड्डी'मधील धाकड पैलवान लूक आऊट; वाढदिवशी चाहत्यांना मोठी भेट!

स्वालिया न. शिकलगार

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'पेड्डी' (Peddi) चित्रपटाचा धमाकेदार फर्स्ट लूक आणि टीझर रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या या स्पोर्ट्स-ॲक्शन ड्रामा चित्रपटात राम चरण एका राकट आणि पिळदार शरीरयष्टीच्या पैलवानाच्या (Pehelwan) भूमिकेत दिसत आहे. लांब केस, पिळदार स्नायू आणि हातात गदा घेतलेल्या राम चरणचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Peddi Ram Charan First Look out

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या आगामी 'पेड्डी' (Peddi) या चित्रपटासाठी राम चरणने आपल्या बॉडीमध्ये बदल केले आहेत. हा चित्रपट ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित स्पोर्ट्स-ॲक्शन ड्रामा आहे. आता रामचरणची या चित्रपटातील मुख्य भूमिकेतील पैलवानाची झलक समोर आलीय. पिळदार शरीरयष्टीत, हातात गदा घेऊन तो एका गुडघ्यावर बसलेला दिसतोय.

चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असून संगीत ए.आर. रहमान यांचे आहे. हा चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. राम नवमी निमित्त राम चरणने हा लूक सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याने एक्स हँडलवर फोटो ट्विट करत लिहिले- ''Happy Sri Rama Navami Here is the Peddi Pehelwan Glimpse.''

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'मेगा पॉवर स्टार' राम चरण आज, २७ मार्च २०२६ रोजी आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट देत त्याच्या बहुप्रतीक्षित 'पेड्डी' या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या लूकमध्ये राम चरणचा पैलवान अवतार पाहून त्याचे चाहते थक्क झाले आहेत.

राम चरणचे अभूतपूर्व ट्रान्सफॉर्मेशन

बुची बाबू सना दिग्दर्शित 'पेड्डी' चित्रपटात राम चरण चक्क मातीतील कुस्ती खेळणाऱ्या 'पेड्डी पहिलवान'च्या भूमिकेत झळकणार आहे. टीझरमध्ये तो लांब केस, दाढी आणि पिळदार शरीरयष्टीसह दिसत आहे. त्याच्या हातात पारंपरिक गदा आहे आणि तो मातीत सराव करताना दिसत आहे.

नव्या रिलीज डेटची घोषणा

धुरंधर २ मुळे पेड्डीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय. राम चरणने पेड्डीची नवी रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. आधी हा चित्रपट २७ मार्च रोजी रिलीज होणार होता. आता हा चित्रपट ३० एप्रिल रोजी रिलीज होईल.

पेड्डीमध्ये पैलवानाची भूमिका

पेड्डीचा पहिला प्रोमो समोर आला होता. त्यावेळी निर्मात्यांनी 'फर्स्ट शॉट' नाव दिलं होतं. या व्हिडिओमध्ये राम चरण गावातील लोकल क्रिकेटरच्या भूमिकेत होता. या लूकमध्ये गाणे 'चिकिरी चिकिरी' खूप व्हायरल झालं होतं. आता पेड्डीतून राम चरणचा पैलवानातील नवा लूक समोर आला आहे. 'पेड्डी पैलवान' व्हिडिओमध्ये हाच गावातील राउडी क्रिकेटरच आहे, ज्याला कुस्ती लढायची आहे.

पिळदार शरीरयष्टीसाठी काय केलं राम चरणने?

ॲब्ज, बायसेप्स आणि चेस्टसाठी Incline bench press, Sit-ups, क्वाड्स, Push-ups, Pull-ups, पाठीसाठी Back Exercises आणि डेडलिफ्ट्स, हॅमस्ट्रिंग, इनर थाय आणि ॲब्ज, त्यानंतर Rest Day घेतो.

राम चरणचा डाएट प्लॅन

त्याचा आहार अत्यंत साधा आणि शिस्तबद्ध आहे. सकाळचा नाश्ता अंडी, ओट्स आणि बदाम दूध. स्नॅक्समध्ये एक वाटी ताज्या भाज्यांचे सूप. दुपारच्या जेवणात चिकन, ब्राऊन राईस, हिरव्या भाज्यांची करी. संध्याकाळच्या नाश्तामध्ये ग्रील्ड फिश, रताळे आणि उकडलेल्या भाज्या. रात्रीच्या जेवणात मोठी वाटी सॅलड, सुका मेवा आणि एवोकॅडो. तो १२ तासांचे फास्टिंग करतो. रात्री ६ वाजता जेवल्यानंतर तो सलग १२ तास काहीही खात नाही. यामुळे शरीरातील फॅट वेगाने बर्न होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT