मनोरंजन

Pathaan Booking : ‘पठान’ने ३६ तासांत ॲडव्हास बुकिंगने कमावले १४ कोटी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नववर्ष २०२३ ची सुरुवात बॉक्‍स ऑफिसवर धमाकेदार होणार आहे. शाहरुख खानचा चित्रपट 'पठान'ला बंपर ओपनिंग मिळणार आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंग शुक्रवारपासून देशभरात सुरू झाले आहे आणि तिकिट विक्रीची गती (Pathaan Booking) पाहिल्यानंतर असा कयास लावला जात आहे की, हा चित्रपट सुपरहिट ठरेल. शाहरुख खान पठान चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेण्यासाठी तयार आहे. काल शुक्रवारी २० जानेवारीच्या रात्री ११:२० वाजेपर्यंत या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.२ लाख तिकीटांची ॲडव्हास बुकिंग केलीय. यापैकी सर्वाधिक तिकिट हिंदी आणि तमिळ व्हर्जनचे विकले गेले आहेत. 'पठान' २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. प्रत्येक थिएटरमध्ये फर्स्‍ट डे, फर्स्‍ट शो हाऊसफुल झाले आहेत. (Pathaan Booking)

एका वेबसाईटच्या माहितीनुसार, 'Pathaan'च्या हिंदी आणि तेलुगु व्हर्जनमध्ये सर्वाधिक तिकिट्स विकले गेले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या आधी ॲडव्हास बुकिंगने १४.६६ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केलं आहे. म्हणजेच जवळपास ४८ तासात ॲडव्हान्स बुकिंगने नेट कलेक्‍शन जवळपास ११ कोटी कोटी रुपये आहे. आता ॲडव्हान्स बुकिंगसाठी चार दिवस राहिले आहेत. 'पठान' बुधवारी रिलीज होत आहे. त्याच्या पुढील दिवशी गुरुवारी २६ जानेवारी आहे. त्या औचित्याने सुट्टीचा फायदा मिळणार आहे.

या शहरांमध्ये 'पठान'चे बंपर ॲडव्हान्स बुकिंग

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, आतापर्यंत झालेल्या १४.६६ कोटी रुपयांचे ॲडव्हान्स बुकिंगपैकी १ .७९ कोटी रुपयांची कमाई दिल्‍ली-एनसीआरमधून झाली आहे. मुंबईमध्ये १.७४ कोटी रुपयांची ॲडव्हान्स बुकिंग झाली आहे. बंगळुरु, हैदराबाद आणि कोलकातामध्ये पठानची क्रेझ दिसत आहे. शाहरुख खानच्या चित्रपटांविषयी सांगायचं झालं तर 'हॅप्‍पी न्‍यू ईअर' ला २०१४ मध्ये अध‍िक ४४.९७ कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली होती. दुसऱ्या क्रमंकावर 'चेन्‍नई एक्‍सप्रेस' होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT