मनोरंजन

‘दादा, लय मजा येणार हाय..विषय हार्ड होणार हाय’ चित्रपटाचा टीझर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : विषय हार्ड चित्रपटातील "'येडं हे मन माझं…' हे प्रेमगीत तीन लाखांहून अधिक लोकांनी बघितले आहे. या प्रेमगीतामागोमाग 'विषय हार्ड' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट ५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

अधिक वाचा –

'दादा, लय मजा येणार हाय… , अरे नुसती मजाच येणार नाय तर, विषयच हार्ड होणार हाय…' टीझरमधील हा डायलॉग 'विषय हार्ड'मध्ये घडणाऱ्या विनोदाची कल्पना देतो. डॉली आणि संद्याची प्रेमकहाणी यात आहे, पण ही प्रेमकहाणी पूर्ण होताना जो गोंधळ उडतो, तो विनोदी शैलीमध्ये मांडण्यात आला आहे. पर्ण पेठे आणि सुमित या जोडीने ही गुलाबी प्रेमकथा अतिशय उत्तम प्रकारे साकारलेली आहे. त्याशिवाय प्रेमकथेतील गोंधळ सहकलाकारांनी ज्या पद्धतीने मांडला आहे.

अधिक वाचा –

कोण आहे सुमित?

सुमित इंजिनियर असून चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर लघुचित्रपट, टीव्ही एपिसोड्स, रिॲलिटी शोज, जाहिराती अशा माध्यमातून दहा वर्षे काम केले आणि आपल्या अनुभवाच्या पायावर 'विषय हार्ड 'ची निर्मिती केली.

गीतांजली सर्जेराव पाटील, सर्जेराव बाबूराव पाटील आणि सुमित पाटील यांनी बर्डबॅाय एन्टरटेन्मेंट आणि कोल्हापूर टॅाकिज या बॅनरखाली 'विषय हार्ड'ची निर्मिती केली आहे. कथा लेखनासोबतच या चित्रपटाचं दिग्दर्शनही सुमित यांनी केलं आहे. पर्ण पेठे आणि सुमित यांच्यासह हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकार आहेत.

अधिक वाचा –

गीतकार नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी लिहिलेल्या गीतांना साहिल कुलकर्णी यांनी संगीत दिलं आहे.

डिओपी अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी, तर कोरिओग्राफर ओंकार शेटे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. कला दिग्दर्शन स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांचं असून, सौरभ प्रभुदेसाई यांनी केली आहे. सायली घोरपडे वेशभूषा केलेल्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संदीप गावडे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT