अयोध्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डमध्ये तक्रार दाखल परेश रावल अभिनीत सिनेमा द ताज स्टोरीवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला आहे की हा सिनेमा त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आधारित आहे. (Latest Entertainment News)
अयोध्येतील भाजप प्रवक्ता रजनिश सिंह यांनी मे 2022 अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये ताज महलच्या आतील 22 बंद खोल्या उघडण्याची मागणी केली गेली. ज्यामध्ये दावा केला गेला की हे स्मारक मूळ एक मंदिर आहे.
या याचिकेत त्यांनी 17 व्या शतकातील स्मारकाबाबत अधिक खुलासा होण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचा समावेश करत एक समिति स्थापन करण्याची मागणी केली होती. ही याचिका त्यावेळीच रद्द केली होती.
सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्डाकडे सोमवारी केलेल्या आपल्या तक्रारीत म्हणाले आहेत की, ‘मी ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली होती. माझा उद्देश केवळ हा पारदर्शकपणा सुनिश्चित करणे आणि ऐतिहासिक तथ्य समोर आणणे महत्त्वाचे होते. मला समजले की ताज स्टोरी हा सिनेमा माझ्या याचिकेवर बेतला आहे. त्यांनी असा दावा केला की सिनेमाचे पोस्टर, प्रचार सामग्री आणि याचिकेचा विषय हा त्यांच्या परवानगी शिवाय घेतला आहे.’
पुढे ते म्हणतात, ‘ हे माझ्या बौद्धिक आणि कायदेशीर हक्कांचे उल्लंघन आहे.’ जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत सिनेमाच्या प्रमोशन आणि प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली.
तुषार अमरीष गोयल यांनी हा सिनेमा लिहला आणि दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात परेश रावल, जाकिर हुसैन, अमृता खानविलकर नमित दास आणि स्नेहा वाघ मुख्य भूमिकेत आहेत.