अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवालाचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. यावेळी वैद्यकीय अहवालानुसार शेफालीचा मृत्यू कार्डियाक अरेस्टने झाल्याचे समोर आले. फिटनेस फ्रिक असलेली, तसेच प्रकृतीबाबत वेळोवेळी जागरूक असलेल्या शेफालीचे असे जाणे तिचे कुटुंबीय आणि फॅन्सना हादरवणारे ठरले. पत्नी शेफालीच्या मृत्यूनंतर पराग तिच्या मृत्यूच्या बातमीचा प्रसिद्धीसाठी उपयोग करत असल्याचा आरोपही त्याच्यावर केला गेला. या आरोपाला खरमरीत उत्तर त्याने यावेळी दिले आहे.
शेफालीच्या मृत्यूनंतर पराग तिच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्ट तो वरचेवर करत असतो. एका पोस्टमध्ये तो म्हणतो, तो शेफालीला यातून जिवंत ठेवणार आहे. यानंतर एका युझरने त्याच्यावर हा आरोप केला.
नुकताच त्यांनी एक व्हीडियो शेयर केला आहे. यात शेफाली, पराग आणि त्याचे पेट डॉग सिंबा याचा फोटो दिसत आहे. याच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो कायमच सोबत राहू. या पोस्टवर काही लोकांनी त्याला धीर ठेवणाचा सल्ला दिला आहे. तर काहीही तो हे सगळं प्रसिदधिसाठी करतो आहे असा आरोप केला आहे.
यावर पराग व्हीडियोच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहितो, की जे लोक असे बोलून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणत आहेत की मी हे प्रसिद्धीसाठी करतो आहे. तर भाऊ सगळे लोक तुझ्यासारखे नसतात. परीला सोशल मिडियावर अॅक्टिव राहणे आवडायचे. यातून मिळणारे कौतुक तिला आवडायचे. पण मी सोशल मिडियावर फारसा अॅक्टिव नसतो.
पुढे तो लिहतो, ‘ आता ती माझ्या मनात आहेत. मी हे निश्चित करेन तिच्यावर सर्वांनी तिच्यावर कायमच प्रेम करावे. हे अकाऊंट फक्त तिला समर्पित आहे. मी तिच्या आठवणी सगळ्यांशी शेयर करण्याचा जरूर प्रयत्न करेन. तुमच्या नकारात्मक कमेंट्सची मला अजिबात पर्वा नाही. मला केवळ शेफालीवर प्रेम करणाऱ्या लोकांची पर्वा करतो. कायमच करत राहीन.
27 जूनला शेफालीचे निधन झाले होते. शेफालीची मैत्रीण पूजा घईच्या म्हणण्यानुसार कार्डियाक अरेस्टने तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूच्या दिवशी विटामीन सीची दरीप घेतली होती. याशिवाय शेफाली अॅंटी एजींग औषधेही खात होती. त्यादिवशी घरी पूजा असल्याच्या कारणाने शेफालीने दिवसभर उपवास केला होता. त्यानंतर फ्रीजमधील थंड जेवणही खाल्ले यामुळे तिचे बीपी लो होत गेले. परिणामी यातच तिचा मृत्यू झाला होता.