actor Aasif Khan Khan suffering heart attack
मुंबई - वेब सीरीज ‘पंचायत’च्या फुलेरा गावच्या दामाद जीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दोन दिवसांपूर्वी त्याला अचानक ॲटॅक आल्याने रुग्णालयात नेण्यात आले होते. ॲमेजॉन प्राईमची लोकप्रिय सीरीज 'पंचायत'मध्ये त्याने दमदार अभिनय साकारला आहे.
आता आसिफ खानची प्रकृती ठिक असल्याचे वृत्त आहे. त्याला काही दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. आसिफने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्याने आपल्या मनातल्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
आसिफ खानने ‘पाताल लोक’मध्ये काम केलं आहे. 'मिर्जापुर' सह अनेक लोकप्रिय वेब सीरीजमध्ये त्याने आपली दमदार भूमिका साकारली आहे. अलिकडेच त्याने 'द भूतनी' आणि 'काकुडा' चित्रपटात दमदार अभिनय साकारला होता.
आसिफने इन्स्टाग्राम स्टोरीजवर रुग्णालयाच्या रूममधील फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'मागील ३६ तासांपासून हे पाहिल्यानंतर अनुभव आला की, आयुष्य खूप छोटे आहे. यासाठी एक दोन दिवस गोष्टी हलक्यात घेऊ नका. एका क्षणात सर्व काही बदलतं. तुमचयाकडे जे काही आहे, त्यासाठी आभार माना. लक्षात ठेवा की, तुमच्यासाठी कोण अधिक महत्वपूर्ण आहे आणि नेहमी त्याचा सन्मान करा. आयुष्य एक भेट आणि आम्ही धन्य आहोत.'
आसिफने एका वेबसाईटला माहिती दिली. अभिनेता म्हणाला, 'मागील काही तासांपासून मी आरोग्याच्या समस्यांशी लढत आहे. त्यामुळेच मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. पण माझी प्रकृती आता ठीक आहे. आपलं प्रेम आणि शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. आपले समर्थन माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी लवकरच परत येईन.'