

love story of Raj Babbar-Smita Patil
मुंबई - हिंदी चित्रपटाचे अभिनेते राज बब्बर यांनी दुसरा विवाह अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशी केला होता. राज यांच्या पहिली पत्नी नादिरा बब्बर होत्या. स्मिता पाटील यांच्यासोबत नात्याबद्दल जेव्हा नादिरा यांना समजलं तेव्हा त्यांनी दोघांचे नातं समजण्यात परिपक्वता दाखवली. राज बब्बर यांनी स्वत: एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं की, नादिराने स्मिता पाटील सोबत राज बब्बर यांचे नाते एक वैयक्तिक आणि भावनात्मक पातळीवर समजलं आणि त्यांच्यामध्ये कुठलीही कटुता नव्हती.
राज बब्बर-स्मिता पाटील यांची पहिली भेट "भीगी पलकें"च्या सेटवर झाली होती. आणि तेथूनच राज-स्मिता यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. त्यावेळी राज बब्बर-नादिरा यांना आधीच दोन मुले होती. जेव्हा नादिरा यांना राज-स्मिता यांच्या अफेअर विषयी समजलं तेव्हा त्यांनी गॉसिप मानून दुर्लक्ष केलं. पण, सत्य खरंच जेव्हा समोर आले, तेव्हा त्यांनी खूप हिंमत दाखवली.
रिपोर्टनुसार, १९८२ मध्ये आलेल्या 'भीगी पलकें' या चित्रपटात स्मिता पाटीलसोबत काम करताना राज बब्बर पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रभावित झाला होता. रज बब्बर यांनी जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, "मी तिला पहिल्यांदा ओडिसातील राउरकेला येथे भेटलो होतो, जिथे आम्ही सतीश मिश्राच्या 'भीगी पलकें' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेलो होतो. आमची पहिली भेट एका प्रकारच्या संघर्षात संपली - एक गोड संघर्ष, ज्याने नंतर नात्याचा पाया रचला. मी तिच्या पर्सनॅलिटीमुळे प्रभावित झालो."
राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्यात लवकरच प्रेमकहाणी सुरू झाली, त्यांनी सर्व सामाजिक नियमांना झुगारून दिले. राज यांनी सांगितलं होतं की, त्यांची पहिली पत्नी नादिरा ही स्मिता पाटीलबद्दलच्या त्यांच्या तीव्र भावना समजून घेण्याइतकी समजूतदार होती.
राज बब्बर म्हणाले होते, "स्मिताने माझ्या आयुष्यात अनपेक्षितपणे प्रवेश केला. जेव्हा मी स्मिता पाटीलला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला जाणवले की, तिच्या व्यक्तिरेखेत खोली आहे. ती सहज खूप मैत्रीपूर्ण होती आणि अधूनमधून माझा सल्ला घेत असे. हळूहळू, आमच्यात एक जवळचे नाते निर्माण झाले. स्मितासोबतचे माझे नाते नादिरासोबतच्या समस्यांमुळे नव्हते - ते फक्त घडले. नादिरा माझ्या भावना समजून घेण्याइतकी प्रौढ होती. जुहीला नेहमीच स्मितासोबत राहणे आवडायचे."
जुही बब्बर ही राज बब्बर आणि नादिरा यांची मुलगी आहे.
नादिरा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, स्मिता पाटील ही राज यांच्या खूप जवळ होती. माझ्या पतीला देखील एक अशा साथीदाराची गरज होती, जी राज यांना समजून घेईल आणि प्रेम करू शकेल. मी खुश आङे की, राज यांच्या आयुष्यात स्मिता आल्याने ते खूश आहेत.
एका मुलाखतीत स्मिता यांनी त्यांच्या नात्यातील अडचणींबद्दलही बातचीत केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, सर्व सोप आहे आणि सर्व ठिक आहे. खरं तर हे इतकं सोपं नाही. स्मिता यांनी नादिरा यांच्यासाठी म्हटलं होतं की, त्या देखील खूप एकटेपणा आणि वेदनेतून जात असतील. त्यांचं घर आहे, मुले आहेत तर त्या देखील सुरक्षित राहतील.
स्मिता यांच्या निधनानंतर नादिरा यांनी फिल्मफेयरला म्हटलं होतं, मला त्यांची आई, परिवार आणि मुलासाठी खूप दु:ख आहे. त्यांचे स्वप्न आणि इच्छा होत्या. दु:ख आहे की, ते त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. नादिरा म्हणाल्या होत्या की, त्यांच्या निधनाने राज, प्रतीक आणि कुठे न कुठे तरी मलाही खूप त्रास झाला. ती खूप वाईट वेळ होती.
राज-स्मिता यांनी १० डिसेंबर, १९८१ मध्ये विवाह केला. पण नंतर १९८६ मध्य प्रसुतीनंतर स्मिता यांचे निधन झाले होते.