पल्लवी जोशी नव्या चित्रपटातून भेटीला येणार आहे  Instagram
मनोरंजन

Pallavi Joshi | मराठमोळी पल्लवी जोशी झळकणार अनुपम खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटात

Pallavi Joshi Movie Tanvi The Great | मराठमोळी पल्लवी जोशीच्या नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पल्लवी जोशी या भारतीय सिनेमातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्री आणि निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांच्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी करिअरमध्ये त्यांनी टेलिव्हिजनपासून चित्रपटांपर्यंत विविध माध्यमांतून काम केलं आहे आणि आज त्या एक प्रभावशाली चित्रपट निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्या भूमिकांमधील सखोल समज आणि प्रभावी सादरीकरणासाठी पल्लवी जोशी यांना ओळखले जाते. त्या प्रत्येक पात्रात एक वेगळी छाप सोडतात.

‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’सारख्या चित्रपटांमधून भरघोस यश मिळवल्यानंतर पल्लवी जोशी आता त्यांच्या आगामी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून पल्लवी जोशी यांचा कॅरेक्टर पोस्टर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकेचा परिचय दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT