'या' पाकिस्तानी अभिनेत्रीची कान्समध्ये का होतेय इतकी चर्चा? असा पोशाख परिधान केलांय की... file photo
मनोरंजन

Cannes 2026 : 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीची कान्समध्ये का होतेय इतकी चर्चा? असा पोशाख परिधान केलांय की...

तिचे फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

pakistani actress sanam saeed cannes 2026 debut in peacock inspired custom dress grabs attention

पुढारी ऑनलाईन :

फ्रान्सच्या फ्रेंच रिव्हिएरामध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आता ४१ वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. पीकॉक-इन्स्पायर्ड आउटफिट परिधान करून तिने पाकिस्तानच्या ‘ट्रॅजेडी क्वीन’ला श्रद्धांजली वाहिली असून तिच्या देसी ग्लॅमरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

७९व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आता बॉलिवूड आणि हॉलिवूडपेक्षा पाकिस्तानी अभिनेत्री सनम सईदची अधिक चर्चा होत आहे. रेड कार्पेटवर एन्ट्री करताच तिने इतिहास रचला आणि तिचा पारंपरिक अंदाज पाहून सगळेच थक्क झाले. ‘जिंदगी गुलजार है’ या मालिकेमुळे भारतातही लोकप्रिय झालेल्या सनमला पाहून भारतीय प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली.

केसांत गजरा, पीकॉक-थीम ड्रेस आणि देसी स्वॅगसह सनम रेड कार्पेटवर आली तेव्हा तिचा लूक अत्यंत वेगळा आणि आकर्षक वाटला. या लूकद्वारे तिने पाकिस्तानच्या ‘ट्रॅजेडी क्वीन’ शमीम आरा यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अमेरिकन स्टुडिओद्वारे सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमात तिला ‘साऊथ एशियन विमेन एक्सलन्स इन सिनेमा अँड आर्ट्स’ या सन्मानाने गौरविण्यात आले. त्यामुळे तिचे हे कान्स डेब्यू अधिक खास आणि ऐतिहासिक ठरले.

पीकॉक-इन्स्पायर्ड कस्टम ड्रेस

सनमने कान्स डेब्यूसाठी डिझायनर हुसैन रेहार यांचा खास डिझाइन केलेला आउटफिट निवडला. हा ड्रेस पांढऱ्या मोरापासून प्रेरित होता. संपूर्ण ड्रेसमध्ये पांढऱ्या रंगाच्या फ्लोई सिल्हूटसोबत सिल्व्हर शिमरचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे त्याला रॉयल आणि स्वप्नवत लूक मिळाला. ड्रेसवर अतिशय बारकाईने नक्षीकाम करण्यात आले होते.

या लूकमधून सनमने पाकिस्तानच्या ‘ट्रॅजेडी क्वीन’ शमीम आरा यांना श्रद्धांजली वाहिली. जसे बॉलिवूडमध्ये मीना कुमारी यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हटले जाते, तसेच पाकिस्तानमध्ये शमीम आरा या दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

कसा होता हा आउटफिट?

या ड्रेसला हाय-नेक हॉल्टर स्टाइल देण्यात आली होती, तर मागील बाजूस डीप नेक डिझाइन होते. अपर पोर्शनवर मिररवर्क, मुकेश आणि झरदोजीची नाजूक कारीगरी करण्यात आली होती. ड्रेसच्या खालच्या भागात फ्लेअर्ड लेयर्स आणि 3D फ्लोरल डिटेलिंग देण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण लूक अधिक नाट्यमय आणि आकर्षक दिसत होता.

यासोबत सनमने हेवी प्लीट्स असलेला गरारा किंवा घाघरा परिधान केला होता. त्यावर बारीक रेषांसह रुंद सिल्व्हर बॉर्डर देण्यात आले होते. तसेच दुपट्ट्यासारखी ट्रेल हातांवर घेतल्याने तिच्या लूकमध्ये आणखी भर पडली.

५० कारागिरांनी तयार केला ड्रेस

डिझायनरच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरील माहितीनुसार हा आउटफिट तयार करण्यासाठी ५० कारागिरांनी तब्बल २,३५४ तास मेहनत घेतली. संपूर्ण लूकमध्ये पांढऱ्या मोरापासून प्रेरित डिझाइन्स दिसत होते, ज्यांना सिल्व्हर एम्बेलिशमेंटने उठाव देण्यात आला होता. नेकलाइनपासून बॉर्डरपर्यंतची चमक अत्यंत नाजूक आणि उठून दिसणारी होती.

मुकेश एम्ब्रॉयडरी म्हणजे काय?

मुकेश वर्क ही पारंपरिक भरतकामाची कला असून ती विशेषतः लखनौच्या कारीगरीशी जोडली जाते. या तंत्रामध्ये कपड्यावर छोटे मेटॅलिक धागे किंवा फॉइलचे तुकडे हाताने लावले जातात, ज्यामुळे आउटफिटला हलकी चमक आणि शिमर इफेक्ट मिळतो. हे काम प्रामुख्याने जॉर्जेट, सिल्क आणि नेटसारख्या फ्लोई फॅब्रिकवर केले जाते.

सनमने असा पूर्ण केला लूक

सनमच्या आउटफिटमध्ये आधीच भरपूर ब्लिंग असल्यामुळे तिने ज्वेलरीतही क्लासी टच दिला. हॉल्टर नेक असल्याने तिने नेकलेस टाळला आणि स्टेटमेंट इयर कफ्स परिधान केले. फ्रंटमधून स्लीक हेअरस्टाइल आणि कपाळावरील टीका तिच्या लूकला वेगळीच शोभा देत होता. मागे वेणीमध्ये माळलेला गजरा तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता. सिल्व्हर हिल्ससह तिने कान्समधील आपला हा खास डेब्यू लूक पूर्ण केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT