Oscars 2026 Homebound shortlist  instagram
मनोरंजन

Oscars 2026 Homebound : ऑस्कर २०२६ साठी ईशान खट्टरच्या 'होमबाऊंड'ला नामांकन, करण जोहर म्हणाला..

Oscars 2026 Homebound : ऑस्कर २०२६ साठी ईशान खट्टरच्या 'होमबाऊंड'ला नामांकन, करण जोहर म्हणाला..

स्वालिया न. शिकलगार

ईशान खट्टर अभिनीत ‘होमबाऊंड’ला ऑस्कर 2026 साठी नामांकन मिळाल्याने भारतीय सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. या यशावर करण जोहरने प्रतिक्रिया देत हा भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले असून, ‘होमबाऊंड’ जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

मावळत्या वर्षात एक शानदार वृत्त येऊन धडकले आहे, ते म्हणजे अभिनेता ईशान खट्टरचा होमबाऊंड चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. चित्रपट निर्माता करण जोहरचा आनंद यावेळी गगनात मावेना. करण जोहर दिग्दर्शित ‘होमबाऊंड’ (Homebound) ने जागतिक व्यासपीठावरील ९८ व्या ॲकॅडमी ॲवॉर्ड्समध्ये नामांकित करण्यात आले आहे.

१६ डिसेंबर रोजी 'ॲकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेज'ने इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीसाठी जगभरातील १५ चित्रपटांची यादी जारी केले आहे. ज्यामध्ये भारताकडून ‘होमबाऊंड’चा देखील समावेश आहे. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर फॅन्स आणि बॉलीवुड सेलेब्सनी करण जौहर आणि त्याच्या टीमचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

करण जोहरची भावूक पोस्ट

ऑस्करची शॉर्टलिस्ट अधिकृतपणे जहीर झाले आहे. करण जोहरने इन्स्टा पोसेट करून माहिती दिलीय की, मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही की, मी कसे अनुभव करत आहे. #HOMEBOUND चा हा प्रवास माझे आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी एक सुंदर स्वप्नाप्रमाणे आहे. धर्मा प्रोडक्शन्ससाठी हा अभिमानाची गोष्ट आहे की, आमचा चित्रपट जागतिक पातळीवर १५ चित्रपटांमध्ये समाविष्ट झाला आहे. करणने विशेष रूपाने चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवानचे आभार व्यक्त केलं आहे. करणने स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

दिग्गज हॉलीवूड चित्रपट निर्मात्यांची मदत

‘होमबाऊंड’ची खासियत म्हणजे वर्ल्ड सिनेमाचे दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते. त्यामुळे इंटरनॅशनल चित्रपट महोत्सवात खूप कौतुक झाले होते, आता ऑस्करच्या स्पर्धेत आल्याने यशावर शिक्कामोर्तब झाले आहे. नीरज घायवान दिग्दर्शित चित्रपटात ईशान खट्टर, जान्हवी कपूर, विशाल जेठवा यांच्या मुख्य भूमिका होत्या.

काय आहे कथेचा प्लॉट?

या चित्रपटाची कहाणी दोन मित्र, मोहम्मद शोएब आणि चंदन कुमारच्या अवतीबोवती फिरते. हे दोघे आपल्या गावात सामाजिक भेदभाव मुळापासून संपवण्याची शपथ घेतात. त्यांचे एकमेव स्वप्न असते पोलिस परीक्षा पास करून एक चांगले जीवन जगणे. जसे-जसे ते आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी पुढे पावले टाकतात, तेव्हा , व्यवस्थेतील अभाव आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बदल भावूकतेकडे घेऊन जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT