Oscar 2026 साठी भारताचे दोन चित्रपट चर्चेत आले असून ‘महावतार नरसिम्हा’ आणि ‘कांतारा: चॅप्टर 1’ यांनी ऑस्कर रेसमध्ये एन्ट्री घेतली आहे. एकीकडे पौराणिक कथेवर आधारित अॅनिमेटेड सिनेमा तर दुसरीकडे मातीशी जोडलेली पॅन-इंडिया कथा असल्यामुळे या दोन्ही चित्रपटांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
two Indian films race in the Oscar 2026
ऑस्करच्या रेसमध्ये ‘महावतार नरसिम्हा’, ‘कांतारा: चॅप्टर १’ , चित्रपटांचा जनरल एन्ट्री लिस्टमध्ये समावेश झाला आहे. ‘महावतार नरसिम्हा’ आणि ‘कांतारा: चॅप्टर १’ या दोन वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑस्कर रेसमध्ये एन्ट्री घेतल्याची माहिती समोर आलीय.
‘महावतार नरसिम्हा’ हा पौराणिक कथेवर आधारित अॅनिमेटेड चित्रपट आहे. भगवान विष्णू यांच्या नरसिंह अवतारावर आधारित ही कथा अत्याधुनिक अॅनिमेशन तंत्रज्ञान आणि भव्य व्हिज्युअल्समुळे वेगळी ठरली आहे. भारतीय अॅनिमेशन सिनेमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मर्यादित संधी मिळाल्या असताना, महावतार नरसिम्हाची ऑस्कर रेसमधील उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.
दुसरीकडे, ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा: चॅप्टर १ हा सिनेमा आधीपासूनच प्रचंड चर्चेत आहे. कांताराच्या पहिल्या भागाने भारतासह परदेशातही लोकप्रियता मिळवली होती.
आता सर्वांच्या नजरा २२ जानेवारी, २०२६ वर आहे. जेव्हा ऑस्करची अधिकृत नॉमिनेशन यादी जारी होईल आणि तेव्हा निश्चित होणार की, हे चित्रपट फायनलला जाणार की नाही?
होम्बले फिल्म्स बॅनर अंतर्गत ऋषभ शेट्टीचा कांतारा: चॅप्टर १ आणि अश्विन कुमार दिग्दर्शित महावतार नरसिंह अधिकृतपणे अकादमी ॲवॉर्ड्सच्या जनरल एन्ट्री लिस्टमध्ये पोहोचला आहे. सोबतच अनुपम खेर यांचा तन्वी: द ग्रेट देखील बेस्ट पिक्चर कॅटेगरीमध्ये समावेश झाला आहे.
भारताच्या अधिकृत एन्ट्री होमबाऊंडची निवड करण्यात आली आहे. जनरल एन्ट्री लिस्टमध्ये समाविष्ट झाल्यानंतर बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस, बेस्ट स्क्रीनप्ले, प्रोडक्शन डिझाईन, सिनेमॅटोग्राफी यासारख्या मुख्य कॅटेगरीसठी विचाराधीन आहेत. ऑस्कर २०२६ ची अंतिम नॉमिनेशन यादी २२ जानेवारी २०२६ रोजी घोषित केली जाईल.