Omkar Bhojane pudhari
मनोरंजन

Omkar Bhojane : मी किती 'संघर्ष' केला हे सांगण्यात मला रस नाही! चित्रपट प्रमोशनबाबत ओंकारचे पॉडकास्टमधून सडेतोड उत्तर

ओंकारची वर्तणूक वाईट आहे असे म्हणणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना ओंकार भोजणेने पॉडकास्टमधून उत्तर दिलं आहे.

Anirudha Sankpal

Omkar Bhojane Controversy: मराठी अभिनेता ओंकार भोजणे याच्यावर चित्रपट निर्मात्यांनी तो फोन उटलत नाही. प्रमोशन करत नाही सोशल मीडियावर नाही असे आरोप होत आहेत. त्याबाबत आता ओंकार भोजनेने मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये सडेतोड उत्तरे दिली आहेत. त्याने मी त्याबाबतीत थोडा कमी आहे त्यामुळं मी चित्रपटाचे प्रमोश आणि इतर गोष्टींपासून दूर राहतो असं सांगितलं.

यावेळी त्याने चित्रपट निर्मात्यांसोबत झालेल्या वादाबाबत देखील भाष्य केलं. त्याने तो सोशल मीडियावर नाही अन् मला मी कसा संघर्ष केला हे सांगण्यात काही रस नाही कारण मी तसा संघर्ष केलेला नाही. सुदैवाने मला खाण्याची भ्रांत नव्हती अन् झोपेची देखील नव्हती. तसं जर असतं तर मी पळ काढला असता हे काम केलं नसतं असं सडेतोड उत्तर त्याने दिलं.

ओंकार सोशल मीडियावर नसतो

मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये सौमित्र यांनी ओंकारला विचारलं की, 'ओंकार असा माणूस आहे की तो येतो, त्याचं काम करतो आणि निघून जातो. तो सोशल मीडियावर नसतो, तो उगाच छान-छौकेगिरी करत नाही.'

याला उत्तर देताना ओंकार भोजणे म्हणाला की, "माझ्या कामाची थोडी पद्धत अशी आहे की काम कुठलंही असो, मी रीडिंगमध्ये किंवा शूटमध्ये असताना माझा फोन फ्लाईट मोडवर म्हणजे बंदच असतो."

माझं मुख्य काम अॅक्टिंग

तो पुढे म्हणाला, "ॲक्टर म्हणून माझं जे मुख्य काम आहे, माझी ॲक्टिंग, ती माझी करून झाल्यानंतर आता PR आणि त्यांच्या ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत, त्या मला नाही पटत. मी किती संघर्ष केला हे सांगायला मला नाही आवडत.'

सुदैवाने मला खाण्याची भ्रांत नव्हती, मला झोपायची देखील व्यवस्थित जागा होती. तसं जर नसतं तर मी पळून गेले असतो. असं देखील ओंकार भोजणे स्पष्टपणे सांगतो.

चित्रपट झाल्यावर पीआर नेमले जातात

ओंकार भोजणे चित्रपट करतानाच्या कराराबात देखील बोलला. तो म्हणाला की, "सिनेमा तयार झाल्यानंतर PR नेमले जातात. करारात PR ची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ही जर आधी कळली, तर आपण त्याच्यासोबत किती प्रमाणात असणार आहोत हे आधीच सांगू शकतो."

ओंकारला त्याचा चित्रपट प्रमोट करायचाच नाही याबाबत विचारलं तर "आम्हालाही आमचा सिनेमा कौतुकानं सांगायचा असतो की आम्ही काहीतरी केलेलं काम येतंय. त्याला आमचा विरोध का असेल?"

मी जाणीवपूर्वक अलिप्तच राहतो

ओंकार भोजणेने त्याची कामाची पद्धत थोडी वेगळी असल्याचं सागंतिलं, 'माझी थोडी आधीपासूनची सवय आहे की मला जर नाही जमणार असेल, तर मी नाहीच म्हणतो. मला ज्या गोष्टी नाहीच जमत, त्यापासून मी थोडा जाणीवपूर्वक अलिप्तच राहतो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT