Samsung Vs Apple Tim Cook: सॅमसंगच्या 'टीम कूक' यांनी Galaxy Z Fold 8 चं केलं प्रमोशन; Apple ला चांगलंच डिवचलं

Samsung Vs Apple Tim Cook
Samsung Vs Apple Tim Cookpudhari
Published on
Updated on

Samsung Vs Apple Tim Cook: सॅमसंग आणि अॅप्पल या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये तुफान ट्रोलिंग सुरू असतं. यावेळी सॅमसंगने अत्यंत आश्चर्यकारक आणि मजेदार जाहिरात केली आहे. या जाहिरातीद्वारे नुकतेच आपला पहिला फोल्ड फोन बाजारात आणणाऱ्या Apple ला ट्रोल केलं. या जाहिरातीत टीम कूक हे अॅपलला नाही तर Samsung Galaxy Z Fold 8 ला पाठिंबा देत आहेत. हे ऐकल्यावर सर्वांना वाटतं की अॅप्पलचे माजी सीईओ टीम कूक हे सॅमसंगमध्ये गेले आहेत. मात्र तसं नाहीये पूर्ण जाहिरात पाहिल्यानंतर यामागची मजेशीर गोष्ट समोर येते.

Samsung Vs Apple Tim Cook
Apple iPhone price: भारतात आयफोन महागले; आयफोन १७ ची सुरुवात ९९,९०० रुपये, तर १८ प्रो मॉडेल्सच्या किमतीत २२% वाढ

टीम कूक यांनी सॅमसंग मोबाईल केला प्रमोट

सॅमसंगच्या जाहिरातीवर नजर टाकली तर त्यांचा मोबाईल प्रमोट करणारे टीम कूक हे अॅप्पलचे सीईओ नसून ते दुसरेच टीम कूक आहेत. मात्र जाहिरातीत दिसणारे टीम कूक यांनी अॅप्पलच्या टीम कूक यांच्यासारखे कपडे घातले आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांचेही नाव टीम कूक आहे. ते न्यूझीलंडचे पामर्स्टन नॉर्थचे रहिवासी आहेत.

न्यूझीलंडच्या या टीम कूक यांनी अॅपलच्या टीम कूक यांच्यासारखे कपडे घातल्याने लोकांना आश्चर्य वाटलं. जाहिरातीच्या व्हिडिओत त्यांनी चष्मा घातला होता. ते जाहिरातीत म्हणतात की हाय मी टीम कूक फ्रॉम पाल्मी

Samsung Vs Apple Tim Cook
Apple Event 2026: iPhone Duo ते AirPods 5; अॅपलने लॉन्च केले तब्बल 6 नवे प्रोडक्ट्स, जाणून घ्या किंमत-फीचर्स

हा टीम कूक Galaxy Z Fold 8 चा रिव्ह्यू करतो

सॅमसंग न्यूझीलंडच्या या जाहिरातीत टीम कूक नावाचा व्यक्ती Galaxy Z Fold 8 चा रिव्ह्यू करताना दिसतो. त्याच्या जोडीला तो अॅपलच्या जाहिरातीत वापरण्यात येणाऱ्या भाषेची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. या जाहिरातीत तो Galaxy Z Fold 8 ची गुणगाण गात हा फोन सर्वात चांगला आहे असं सांगतो.

Samsung Vs Apple Tim Cook
'Samsung Galaxy S24 Ultra'च्या किमतीत सर्वात मोठी कपात! 58,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

सॅमसंगचा लेटेस्ट फोल्ड फोन

सॅमसंगने नुकतेच Samsung Galaxy Z Fold 8 आणि Fold 8 Pro लाँच केले होते. ९ सप्टेंबरला अॅप्पलने देखील आपला पहिला फोलेड स्मार्टफोन बाजारात लाँच केला. त्याचे नाव iPhone Duo असं आहे. कंपनीला या मोबाईलकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याची सुरूवातीची किंमत ही २ लाख ९९ हजार ९०० रूपये ठेवण्यात आली आहे.

Samsung Vs Apple Tim Cook
iPhone 17 Pro Max थेट देणार Samsung S25 Ultra ला टक्कर! कॅमेरापासून प्रोसेसरपर्यंत जाणून घ्या दोन्हीतील फरक

सॅमसंगने २०१९ मध्ये लाँच केला होता पहिला फोन

सॅमसंगने आपला पहिला फोल्डेबल फोन २०१९ मध्ये लाँच केला होता. त्यानंतर सॅमसंगने आपले अनेक फोल्डेबल हँडसेट लाँच केले आहेत. सध्याच्या घडीला सॅमसंगचा सर्वात लेटेस्ट फोल्ड सीरिज Galaxy Z Fold 8 सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news