नववर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारे मराठी चित्रपट हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाज, नातेसंबंध, प्रेम आणि सूड यांसारख्या भावनांना वेगळ्या पद्धतीने मांडताना दिसत आहेत. नव्या दिग्दर्शकांची धाडसी मांडणी, दमदार अभिनय आणि वास्तववादी कथा यामुळे यंदाचे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत.
New Year 2026 upcoming Marathi Movies
'सूड शकारंभ'
सुड चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून चित्रपटात गावातील चित्रीकरण पाहायला मिळेल. गावच्या मातीत दडलेली सत्ता, अहंकार, सूड दाखवणारा ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित अॅक्शन-ड्रामा-थ्रिलर १६ जानेवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन शोएब खतीब, ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे सहयोगी निर्माता दत्तसंग्राम वासमकर आहेत.
मनीषा मोरे, आयुष उलघडे, ओम पानस्कर, सुनील सूर्यवंशी, अनिल राबाडे,ऐश्वर्या मल्लिकार्जुन, सोनाली घाडगे, सलोनी लोखंडे, राज साने, मारुती केंगार यांच्या दमदार भूमिका आहेत. कार्यकारी निर्माते श्रीराज पाटील, संगीत विकी वाघ आणि आर. तिरूमल यांनी दिले आहे. मनीष राजगिरे, हर्षवर्धन वावरे, विकी वाघ आणि मयुरी जाधव यांचे संगीत आहे. छायाचित्रण धुरा रोहण पिंगळ, अमेय तानवडे, संकलन रोहित रुकडे, कला दिग्दर्शन सोनाली घाडगे, प्रॉडक्शन मॅनेजमेंट जीत शहा, दिगंबर शिंदे आणि ओंकार गूळीक यांची आहे.
‘केस नं. ७३’
ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे...अशा टॅगलाईनसह येतोय ‘केस नं. ७३’. लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज निर्मित ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे, निर्मिती शर्वरी सतीश वटक, डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केली आहे. सहनिर्माते प्रविण अरुण खंगार आहेत. अशोक शिंदे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे, राजसी भावे, असे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.
दिग्दर्शक डॉ.मिलिंद आपटे म्हणाले, ‘हा केवळ रहस्यमय चित्रपट नाही, तर प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणारी कथा आहे. प्रत्येक प्रेक्षक या कथेत स्वतःचं वेगळं सत्य शोधेल. पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर, मंदार चोळकर यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून संगीत अमेय मोहन कडू यांनी दिले आहे. छायांकन निनाद गोसावी यांचे आहे.
'लग्नाचा शॉट'
अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. याआधी प्रियदर्शिनीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर अभिजीत टीव्ही अभिनेता आहे. अक्षय गोरे दिग्दर्शित हा चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महापर्व फिल्म्स आणि जिजा फिल्म कंपनी प्रस्तुत ‘लग्नाचा शॉट’चे गीत, संगीत प्रवीण कोळी-योगिता कोळी तर अक्षय गोरे, विजय गोरे, सुरेश प्रजापती, अभिषेक कोळी निर्माते आहेत.
प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, 'अशा प्रकारचा रोमँटिक चित्रपट मी पहिल्यांदाच करतेय. आमचं एक रोमॅंटिक गाणंही आहे. अभिजीत अत्यंत शिस्तबद्ध असून चित्रीकरणाच्या ठिकाणी सगळं अतिशय संयमानं हाताळतो. आमची ओळख नव्हती, मात्र या निमित्ताने अभिजीतशी छान ओळख निर्माण झाली. मी स्वतः तालमींवर भर देणारी कलाकार असल्यामुळे अनेकदा ‘एकदा पुन्हा सीन करूया' असं सुचवायचे आणि त्याने त्यासाठी नेहमीच मनापासून साथ दिली.’
'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यामध्ये नवीन काहीतरी पाहायला मिळेल, असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आहे. अक्षर फिल्म्स बॅनर अंतर्गत पायल पठारे आणि मेघमाला पठारे यांनी 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
प्रेम, मैत्री, गुन्हा आणि त्यागाची आगळीवेगळी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळेल. 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'च्या माध्यमातून एक अनोखी प्रेमकथा आहे. या चित्रपटाद्वारे एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यांची केमिस्ट्री लक्ष वेधणार आहे. ऋषिकेश वांबूरकर, कश्मिरा, अमित रेखी, रिषी, अभिजीत दळवी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
पं. शौनक अभिषेकी, आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांनी 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'मधील गाणी गायली आहेत. डिओपी कृष्णा सोरेन, ओमकार आर. परदेशी यांनी संकलन तर प्रशांत जठार आणि मंगेश जोंधळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. लाईन प्रोड्युसर सूर्यकांत वड्डेपेल्ली तर दिप्ती जोशी आणि कश्मिरा यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. नाना मोरे आणि राजू येमूल यांनी कला दिग्दर्शन, रंगभूषा निकिता निमसे, पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांनी दिले आहे.
'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?
'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? १६ जानेवारी पासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे. सासूबाई सुनबाई यांची जुगलबंदी ही ठरलेलीच. पण यात एकमेकांची उणी धुणी काढताना प्रेक्षक म्हणून जी धम्माल येणार आहे.