पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवर पोस्ट ऑफिस उघडं आहे, ही मालिका लवकरच पाहायला मिळणार आहे. या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे…' या मालिकेची ही झलक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरते आहे. सोशल मीडियावरही तिची वाहवा होते आहे.
'पोस्ट ऑफीस उघडं आहे…' मालिकेच्या विषयाला धरून प्रेक्षकांची उत्सुकता वाढते आहे. ज्यांनी पोस्ट ऑफिसचा काळ अनुभवला आहे, त्यांच्यासाठी ही झलक स्मरण रंजनवत ठरली आहे आणि ज्यांनी तो काळ अनुभवला नाहीये त्यांच्यासाठीही चर्चेचा विषय ठरली आहे. नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून या मालिकेत एक हलकाफुलका विषय पाहायला मिळेल. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे…' या मालिकेतून पोस्ट ऑफिस हा विषय सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे. ही हास्याची मनी ऑर्डर महाराष्ट्राला नक्कीच आवडेल. पाहायला विसरू नका नवी मालिका – 'पोस्ट ऑफीस उघडं आहे…' लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.