Kokan Mahotsav : कोकणात ग्रीन रिफायनरी आणणारच – उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

Kokan Mahotsav : कोकणात ग्रीन रिफायनरी आणणारच - उपमुख्यमंत्री फडणवीस

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kokan Mahotsav : आम्हाला कोकणचा विकास करायचा आहे. आता आहे त्यापेक्षा उत्तम पर्यावरण राखून कोकणचा विकास घडवून आणू. कोकणच्या विकासासाठीच आम्ही कोकणात ग्रीन रिफायनरी आणणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Kokan Mahotsav : ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे उद्घाटन आज मंगळवारी सकाळी 9 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या गोरेगाव येथील नेसको मैदानात ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोकणभूमी प्रतिष्ठान, मी मुंबईकर अभियान या संस्थांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘या’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 6 डिसेंबर ते शुक्रवार 9 डिसेंबर 2022 या कालावधीत हा महोत्सव होत आहे. यावेळी कोकणचा विकास, समस्या, प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी मत व्यक्त करून भविष्यातील योजनांबाबत भाष्य केले.

Kokan Mahotsav : यावेळी, कोकणी माणूस येथील आंब्याप्रमाणे गोड आहे, असे फडणवीसांनी म्हटले. त्यांनी पर्यावरणाला धक्का न लावता पर्यटन, बंदर, मासेमारीचा विकास करू, असे मत नोंदवले. तर रिफायनरी ही कोकणाच्या विकासासाठी महत्वाची असून आपण येथे ग्रीन रिफायनरी आणणारच, असा निर्धार व्यक्त केला. तसेच विकासाच्या या प्रक्रियेत येथील मूळ आदिवासी, आगरी समाजाचे संरक्षण व्हायला हवे, असे देखील फडणवीसांनी म्हटले.

हे ही वाचा :

महिलेला गर्भपातास उच्च न्यायालयाची सर्शत परवानगी

उच्च न्यायालयातील याचिकेला दहा वर्षे पूर्ण; दक्षिणगंगेला प्रदूषणमुक्तीची प्रतीक्षाच!

Back to top button