Manisha Koirala on Nepal Protest  Instagram
मनोरंजन

Manisha Koirala | 'नेपाळचा काळा दिवस' भ्रष्टाचाराविरुद्ध उठलेल्या आवाजाला गोळीबाराचं उत्तर; काय म्हणाली मनीषा कोईराला?

Manisha Koirala Nepal Protest | 'नेपाळचा काळा दिवस' भ्रष्टाचाराविरुद्ध उठलेल्या आवाजाला गोळीबाराचं उत्तर; काय म्हणाली मनीषा कोईराला?

स्वालिया न. शिकलगार

मुंबई - नेपाळमध्ये Gen Z आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर अवघ्या २ दिवसांत केपी शर्मा ओली यांचं सरकार कोसळले. दुसरीकडे, नेपाळची लेक, बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधले.

जनरेशन जेड (जेन जी) पहिल्यांदाच आक्रमक होत नेपाळ सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. नेपालमध्ये सरकार विरोधात आंदोलन सुरु झालं. परिणामी, पंतप्रधान ओली यांना राजीनामा द्यावा लागला. या हिंसाचारात २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाने आंदोलनकर्त्यांचे समर्थन करत पोस्ट लिहिली.

दरम्यान, या घडामोडींवर बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला, जी मूळची नेपाळची आहे, हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली.

काय म्हटलं मनिषा कोईरालाने पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये मनीषाने एक फोटो पोस्ट करून कॅप्शन देखील लिहिलीय. पोस्टमध्ये तिने रक्ताने माखलेल्या एका बुटाचा फोटो पोस्ट केलाय. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं – ''आज नेपाळसाठी काळा दिवस आहे - जेव्हा जनतेचा आवाज, भ्रष्टाचाराविरुद्धचा त्यांचा राग आणि न्यायाच्या त्यांच्या मागणीला गोळ्यांनी उत्तर देण्यात आले.''

मनीषाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिचं समर्थन केलं असून "हे आंदोलन फक्त नेपाळचं नाही, तर नव्या पिढीच्या हक्कांसाठीचा लढा आहे" असं मत व्यक्त केलं.

मनीषाचे आजोबा नेपाळचे पहिले पंतप्रधान होते. तिने काही दिवसांपूर्वी आजोबांचा एक फोटोदेखील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये मनीषाने काय लिहिलं?

Manisha Koirala post

मनीषाने ३ महिन्यांपूर्वी दिले होते संकेत

तीन महिन्यांपूर्वी एका बातचीतमध्ये, मनीषाने नेपाळच्या काही गंभीर राजकीय समस्येवर आपली प्रतिक्रिया दिली होती. 'प्रत्येक नेता मागील नेत्याने जे केले ते उलट करतो. म्हणूनच नेपाळमध्ये लोकशाही काम करत नाही. कोणतेही सरकार टिकत नाही. नेपाळमध्ये संतुलन राखण्यासाठी राजेशाहीची आवश्यकता आहे असे मला वाटते.'

'मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे. पण मला काळजी वाटते की येथे आदर आणि स्थिरतेचा अभाव आहे. आपल्याला केवळ सरकारचे नाही तर संस्थांचीही पुनर्बांधणी करावी लागेल,' असेही तिने नमूद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT