Nawazuddin Siddiqui confirm in film the Tumbbad 2 instagram
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui confirm Tumbbad 2 |'तुंबाड'च्या लोककथेत नवाजुद्दीनची खास भूमिका, सोहम शाहने पोस्ट केली शेअर

Nawazuddin Siddiqui confirm Tumbbad 2 | 'तुंबाड'च्या लोककथेत नवाजुद्दीनची खास भूमिका, सोहम शाहने पोस्ट केली शेअर

स्वालिया न. शिकलगार

‘तुंबाड’च्या सीक्वेलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोहम शाहने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले आहे. ‘तुंबाड 2’मध्ये नवाजुद्दीनची एंट्री झाल्यास चित्रपटाचा थरार आणि गूढता आणखी वाढेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

Nawazuddin Siddiqui confirm Tumbbad 2 movie

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला तुम्बाड (Tumbbad) हा चित्रपट आपल्या वेगळ्या कथानक, गडद वातावरण आणि लोककथेवर आधारित थरारामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. ‘हस्तर’ या रहस्यमय पात्राभोवती फिरणारी कथा आणि लोभाच्या भावनेवर आधारित संदेश यामुळे हा चित्रपट आजही चर्चेत असतो. आता या चित्रपटाचा सीक्वल येतोय. या चित्रपटाचे अभिनेता व निर्माता सोहम शाहने (Sohum Shah) काही दिवसांपूर्वी ‘तुंबाड २’ येणार असल्याचे सांगितले होते. आता तुंबाडच्या कथेत एका बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री झालीय.

दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारा नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा ‘तुंबाड २’ मध्ये खास भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोहम शाहने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये नवाजुद्दीनसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शन दिलीय. या पोस्टनंतर चाहत्यांनी तर्क लावायला सुरुवात केली की, नवाजुद्दीनची एंट्री ‘तुंबाड’च्या विश्वात होणार आहे.

सोहम शाहने पोस्टमध्ये काय म्हटलं?

सोहम शाहने आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलंय- 'आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आमच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक nawazuddin siddiqui Tumbad2 मध्ये सामील झाला आहे.'

त्याच्या भूमिकेबद्दलची माहिती गुपित ठेवण्यात आली असली तरी, तो चित्रपटाच्या लोककथेतील मध्यवर्ती भूमिका साकारेल असे म्हटले जात आहे. रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, तुंबाड हा चित्रपट नेहमीच त्याच्या कथेमुळे मला आवडणारा चित्रपट राहिला आहे. जेव्हा सोहमने सिक्वेलसाठी व्हिजन शेअर केले तेव्हा मला कथा आवडली आणि मी त्यांच्या प्रवासात सामील झालो.

या सिक्वेलची निर्मिती अद्याप सुरू झालेली नाही. गेल्या महिन्यात, यातील भूमिकेसाठी अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा होती. आता ही भूमिका नवाजुद्दीनलाच मिळाली आहे. नवाज त्याच्या वास्तववादी आणि उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रात अकेली है’ यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका र्पभावी ठरल्या आहेत. आता हिट तुंबाड सारख्या चित्रपटाच्या सीक्वलमध्यो तो काय जादू दाखवणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT