मनोरंजन

अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा असा झाला करुण अंत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

४० आणि ५० च्या दशकातील प्रसिध्द अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा आज स्मृतीदिन आहे. २०१० मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. मृत्यूवेळी त्या एकट्या होत्या. त्यांचा मृतदेह घरात तीन दिवस पडून होता. नलिनी जयवंत यांनी अनेक हिट चित्रपट दिले होते. १९४१ मध्ये रिलीज झालेल्या 'बहन' चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली होती.

नलिनी जयवंत

बालकलाकार म्हणून केलं डेब्यू

चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून डेब्यू करणाऱ्या नलिनी यांनी मुख्य अभिनेत्री म्हणूनही अभिनय केले. पण, शेवटच्या क्षणी न कुटुंबीय होते न चित्रपट इंडस्ट्रीतील कुणी तिला साथ दिली. कधीकाळी यशाचं शिखर गाठणाऱ्या नलिनी यांना शेवटी एकटे जीवन जगण्यास भाग पडले.

नलिनी जयवंत

वयाच्‍या १४व्‍या वर्षी करिअरची सुरुवात

नलिनी यांचा जन्म १८ फेब्रुवारी, १९२६ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्री शोभना समर्थ यांच्‍या त्‍या चुलत बहिण होत्या. नलिनी यांनी आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या १४ व्या वर्षी १९४१ मधून चित्रपट 'राधिका'तून केली होती. पुढे 'समाधी' आणि 'संग्राम' यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्या टॉपच्या स्टार बनल्या होत्या. अशोक कुमारसोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. नलिनी-अशोक कुमार यांनी 'काफिला', 'जलपरी', 'लकीरें', 'मिस्टर एक्स' आणि 'तूफान में प्यार कहां' चित्रपट केले होते.

नलिनी जयवंत

मधुबालाला टक्कर

नलिनी त्यावेळची टॉप अभिनेत्री मधुबालालादेखील सौंदर्याच्याबाबतीत टक्कर द्यायच्या. ६० च्या दशकत नलिनी यांना चित्रपटांमध्ये कामे मिळण्यास बंद झाले. त्यानंतर त्या चित्रपटांपासून दूर गेल्या. त्यांनी चित्रपट दुनियेपासून संन्यास घेतला.

नलिनी जयवंत

नलिनी यांनी दोन विवाह केले होते. पहिले लग्न दिग्दर्शक वीरेंद्र देसाईशी झाले होते. दुसरे लग्न अभिनेते प्रभु दयालशी झाले. परंतु, नलिनी यांच्या शेवटच्या काळात त्यांच्याजवळ कुणीही नव्हते. त्या एकट्या जगायच्या. नलिनी यांचा मृत्यूनंतर तीन दिवसांनी त्यांचा एक दूरचा नातेवाईक आला. तो नलिनी यांचा मृतदेह शववाहिकेत घेऊन गेला. त्या एकट्याच घरात राहायच्या. शेवटी त्यांच्याकडे घर चालवण्यासाठी पैसेदेखील नव्हते. अशा प्रकारे एका स्टार अभिनेत्रीचा दुर्देव अंत झाला होता.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT