मिलेनियल्सच्या जगात एम टीव्हीला खास स्थान आहे. एका पॉप किंवा इंडि म्युझिक असो नवीन जगाची ओळख तरुण वर्गाला एम टीव्हीने करून दिली आहे. पण आता एम टीव्ही केवळ एक आठवण बनून राहणार आहे. कारण एम टीव्ही 80s आणि एम टीव्ही म्युझिक, क्लब एमटीव्ही, एम टीव्ही 90 s आणि एम टीव्ही लाईव्ह हे चॅनेल आता बंद होणार आहेत. (Latest Entertainment News)
पॅरामाऊंट ग्लोबलने 12 ऑक्टोबर 2025 ला घोषणा केली हे चॅनेल 31 डिसेंबर 2025 ला जगभरात बंद होतील. पण काळजी करू नका ! एमटीव्ही एच डी रिअलिटी टीव्ही शोचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहतील. एम टीव्ही केवळ संगीत व्हीडियो आणि ब्रॅंडिंग प्रसारित करणारे चॅनल बंद करणार आहे.
या चॅनेल्ससाठी घटणारी प्रेक्षकसंख्या घातक ठरल्याचे सांगितले जाते आहे. या चॅनेल्ससाठी वेगाने घटत जाणारी प्रेक्षकसंख्या ही एक मोठी समस्या बनली होती. टिकटॉक, युट्यूब आणि स्पॉटीफाय च्या संगीत जगतातील दबदबा वाढल्यानंतर एम टीव्हीचे संगीत जगातील महत्त्व कमी झाले.
अलीकडेच पॅरामाऊंट ग्लोबलच्या स्काय डान्स मीडियासोबत विलय झाला. त्यानंतर हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे. या विलयानंतर 500 कोटींची जागतिक कॉस्ट कटींगही केली जाते आहे. त्यानंतर हे म्युझिक चॅनेल बंद करणे एका युगाचा अंत मानला जात आहे.
एम टीव्ही बंद होण्याच्या बातमीने सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. एक यूजर म्हणतो, यापूर्वी एम टीव्हीचे म्युझिक कधीच खराब वाटले नाही. 80 च्या दशकातील एम टीव्ही बेस्ट होते.
एकजण म्हणतो, ‘आर आय पी एम टीव्ही ! 40 वर्षांनंतर अमेरिकेबाहेरचे चॅनेल एम टीव्ही बंद करत आहे. एकाने जुन्या दिवसांना उजाळा दिला आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ एम टेलिव्हिजन यापूर्वी 24 तास म्युझिक व्हिडियो प्रीमियर करत असे पण त्याने त्यानंतर रिअलिटी शोवर अधिक लक्ष केंद्रित केले.
कारण यातून त्याला चांगलाच फायदा मिळाला.’ तर अनेक यूजरने एम टीव्हीने आपला संगीत प्रसारणाचे मूळ सोडले तेव्हाच या चॅनेल्सच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली असल्याचे मत अनेक युजर्सनी व्यक्त केले.