अभिनेत्री मृणाल ठाकूर अलीकडे तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या मुलाखती आणि जुन्या व्हीडियोमुळे जास्त चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने अभिनेत्री बिपाशा बासुच्या शरीरयष्टीवर कमेंट केली होती. ‘बिपाशा पुरषी दिसते' असे स्टेटमेंट देऊन तिने नेटीझन्सची चांगलीच नाराजी ओढवून घेतली होती. यानंतर तिने बिपाशाची माफी मागत मी असे बोलायला नको होते असे विधान केले. (Latest Entertainment News)
हे प्रकरण शांत होते न होते तोच आता एक नवीन व्हीडियो समोर आला आहे. यामध्ये मृणालने करियर संदर्भात बोलताना अनुष्काचा उल्लेख न करता तिच्यावर कमेंट पास केली आहे. या मुलाखतीमध्ये तिने न स्विकारलेल्या सिनेमांविषयी बोलताना ही कमेंट केली. सुलतानमध्ये अनुष्काने साकारलेली व्यक्तिरेखा ही यापूर्वी मृणाल ठाकूरला ऑफर झाली होती. पण मृणालने तो सिनेमा नाकारल्यावर त्याजागी अनुष्का शर्माची वर्णी लागली होती.
याबाबत बोलताना ती म्हणाली होती की, 'सुरुवातीच्या दिवसांत मी त्यासाठी काम करत नव्हते. मी खूप सिनेमांना नाही म्हणाले आहे. कारण मी यासाठी तयार नव्हते.
हा वादाचा विषय आहे. हा सिनेमा सुपरहिट झाला आणि त्या अभिनेत्रीला यश मिळाले. पण मला मनापासून वाटत होत. हे सिनेमे मी केले असते तर स्वत:ला हरवून बसले असते. पण आता पहा ती काम करत नाहीये. पण मी काम करते आहे. हा एकप्रकारचा विजयच आहे. जे यश लगेच मिळते ते लगेच नाहीसे होते. मला असे यश आवडत नाही. मी खुपकाळ टिकणाऱ्या यशावर विश्वास ठेवते.
मृणाल तिच्या या स्टेटमेंटमुळे पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकजण यावर म्हणतो, ‘ अतिशय स्वार्थी मुलगी. ती आता काम करत नाही पण मी करते आहे. याचा अर्थ काय? स्वत:चे मोठेपण दाखवण्यासाठी दुसऱ्याला कमी का लेखायचे?
तर दूसरा म्हणतो 'तिने लक्षात ठेवायला हवे सुलताननंतर अनुष्काने स्वत:च्या सिनेमांची निर्मिती सुरू केली.’ सुलतानमधील भूमिका नाकारून तिने एक मोठी संधी गमावली आहे असे अनेकांचे म्हणणे आहे.’
मृणाल सुलतानसाठीची पहिली चॉइस होती हा खुलासा खुद्द सलमानने एका शोमध्ये केला होता. अर्थात मृणालच्या व्यक्तव्यामुळे ती पुन्हा ट्रोल व्हायला सुरू झाली आहे.