Janhavi Kapoor: श्रीदेवीच्या या सुपरहिट सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार जान्हवी कपूर?

अमृता चौगुले

जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला परमसुंदरी सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे

याशिवाय तिचा आगामी सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा सिनेमाही रिलीजसाठी सज्ज आहे

पण सध्या जान्हवीच्या वेगळ्याच सिनेमाची चर्चा सुरू आहे

जान्हवी आई श्रीदेवीच्या चालबाजच्या रिमेकमध्ये दिसणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे

श्रीदेवीच्या सर्वांग सुंदर अभिनयाने नटलेला सिनेमा म्हणून चालबाज ओळखला जातो.

या सिनेमात तिच्या डबल रोलचे कौतुकही झाले होते

36 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमाची जादू अजूनही कायम आहे

तेव्हा या सिनेमाने जवळपास 15 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता

श्रीदेवीने साकारलेल्या अंजू आणि मंजू या व्यक्तिरेखा जान्हवी कशी साकारेल याची फॅन्सना उत्सुकता आहे