

कोरियोग्राफर फराह खान अनेकदा तिच्या व्लॉगमधून सेलिब्रिटींच्या घराचा व्हीडियो समोर आणते. आताही तिने धनश्री वर्माच्या घरातून व्लॉग शेयर केला आहे. यामध्ये धनश्रीने तिचे नाते, युजवेंद्र सोबतचे बॉंडिंग आणि तिच्या आगामी नात्याबाबतही सुतोवाच केले आहे.फराह तिच्या कुकिंग व्लॉग चॅनेलसाठी धनश्रीच्या घरी गेली होती. यादरम्यान फराहने धनश्रीसोबत अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत.
धनश्रीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर युजवेंद्र आणि आरजे महावश यांच्या नात्यांच्या चर्चा वाढल्या आहेत. या दोघांनी अजून उघडपणे हे नाते मान्य केले नाही.
तर दुसरीकडे धनश्री मात्र पुन्हा नात्यासाठी उत्सुक असल्याचे समोर येत आहे. व्लॉगमध्ये फराहला धनश्रीने एक पेंटिंग दाखवले. हे धनश्रीच्या आजीने काढले असल्याचे तिने सांगितले. यामध्ये एक लव्हबर्डस दिसत होते. यावर धनश्री म्हणते, 'मी हे लव्हबर्डस मॅनिफेस्ट केले आहेत.’ तिचे हे उत्तर ऐकून फराह काहीशी आश्चर्यचकित झाली. ती धनश्रीला म्हणते 'परत?’. पुढे ती धनश्रीला धाडसी मुलगी म्हणते आणि तिला मिठी मारते. तिने नात्याबाबत संकेत दिले असले तरी सध्या कोणाशी रिलेशनशिपमध्ये असण्याबाबत मात्र मौन बाळगले आहे.
पुढे व्लॉगमध्ये फराह तिला युजवेंद्रसोबतच्या नात्याबाबत विचारते. ती म्हणते, ‘ आता सगळे ठीक आहे का? आई-बाबांना वाईट वाटले असेल. त्यावर ती म्हणते, ‘हो अपसेट होते, पण आता सगळे ठीक आहे. पण बाहेरचे लोक ज्याप्रमाणे वागतात ते तुम्हाला माहिती आहेच.
आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट स्वीकारली आहे. आम्ही आता मुव ऑन केले आहे. आता आम्ही एकमेकांचा आदर करणे हे जास्त योग्य राहील. आता आयुष्यात पुढे जाणेच योग्य राहील. आम्ही अजूनही टचमध्ये आहोत. पण हे नाते आता परिपक्व आहे.’ यावर फराह म्हणते की युजवेंद्र चांगला मुलगा आहे.
धनश्रीने सध्या डान्ससोबतच तिचा फोकस गाण्यावरही ठेवला आहे. याशिवाय ती अशनीर ग्रोवरच्या राईज अँड फॉल या शोमध्ये दिसणार आहे.