Mrunal Thakur Dacoit film Announcement x account
मनोरंजन

Dacoit release date | प्रेम आणि थराराचा संगम! मृणाल ठाकूरच्या 'डकैत एक प्रेमकथे'चा फर्स्ट लूक आऊट

Mrunal Thakur Dacoit release date Announce | मृणाल ठाकूरच्या डकैतची रिलीज डेट जाहीर करण्यात आलीय

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : अदिवी शेष-मृणाल ठाकुर स्टारर आगामी ॲक्शन-ड्रामा डकैतची प्रतीक्षा आहे. आता या चित्रपटाची पहिली झलक अधिकृतरित्या आज सोमवार, २६ मे रोजी जारी करण्यात आला आहे. मृणाल ठाकुरने शनिवारी सोशल मीडियावर एक मजेशीर बिहाईंड द सीन व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये प्रशंसक, फॅन्सची चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहायला मिळाली. क्लिपमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकुरने खुलासा केला की, तिचे सह-कलाकार अदिवी सेशने तिला २४ मे रोजी पहिली झलक पाहण्यासाठी आमंत्रित केलं होतं. आता डकैट एक प्रेम कथा या चित्रपटाची पहिली झलक समोर आली असून मृणालने इन्स्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे.

डकैतमध्ये मृणाल ठाकुर आणि अदिवी शेष यांच्या मुख्य भूमिका आहेत. ॲक्शनने भरपूर एक गंभीर कहाणी पडद्यावर येत आहे. रिपोर्टनुसार, मृणालच्या आधी ही भूमिका श्रुती हासनला ऑफर करण्यात आली होती. चित्रपटासाठी एक प्रोमो देखील शूट केलं होतं. पण ती या चित्रपटातून बाहेर पडली. त्यामुळे चित्रपट मृणालला मिळाला.

कोणत्या तारखेला होणार डकैट चित्रपट रिलीज?

मृणालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला कॅप्शन लिहिली आहे. तिने म्हटलंय-A reunion with ex. Bittersweet? No. Catastrophic? Hell, yeah! #DACOIT IN CINEMAS WORLDWIDE ON DECEMBER 25th.

यावर्षी हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी जगभराती रिलीज केला जाणार आहे.

काय आहे डकैतची कथा?

रिपोर्टनुसार, डकैत एक रागीट गुन्हेगारावर केंद्रीत कहाणी आधारित आहे, जो आपल्या एक्स प्रेयसीचा बदला घेतो, जिने त्याला धोक दिलेला असतो. सुप्रिया यारलागड्डा द्वारा निर्मित, सुनील नारंग द्वारा सह-निर्मित, डकैत एक द्विभाषी चित्रपट आहे. हिंदी आणि तेलुगुमध्ये एकत्रच शूट करण्यात आलं आहे. कहाणी आणि पटकथा शेनिल देव आणि अदिवी सेश यांची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT