मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : बागाच्या गर्लफ्रेंडने ‘बबीता’ला टाकले मागे

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) ही मालिका चाहत्यांच्या घरांघरात पोहोचली आहे. या मालिकेतील जेठालाल, बबितासोबत बागाच्या भूमिकेने चाहते भारावून गेले आहेत.

या मालिकेत बागाची गर्लफ्रेंड बावरी म्हणजेच मोनिका भदोरिया हिने खूपच रंजक पात्र साकारले आहे. परंतु, Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत दाखवलेली बावरी रिअल लाईफ कशी दिसते माहिती आहे का? तर मग जाणून घेवूयात…

चुका करणाऱ्या मुलीची भूमिका

या मालिकेत मोनिका भदोरियाने बगाची मैत्रीण बावरीची भूमिका साकारली होती. यानंतर तिला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतले. मोनिकाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत एका सारख्या -सारख्या चुका करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे. बावरी चुका करायची आणि जेठालाल तिच्यावर पुन्हा- पुन्हा रागावत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे.

तारक मेहता या मालिकेत बागाचे कामातून लक्ष विचंलित करण्यासाठीच बावरीचे पात्र आणले गेले होते. मोनिकाची कॉमिक टायमिंग अप्रतिम असल्याने तिची ही भूमिका सर्वांना चाहत्यांना आवडली.

मोनिका भदोरियाने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये सलग ६ वर्षे काम केले. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. तिने ही मालिका सोडल्यानंतर चाहते तिच्यावर खूपच नाराज झाले. अजुनही चाहते या मालिकेत बावरी येण्याची आतुरतेने वाट पाहात असतात.

मोनिका भदोरिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून ती स्वत:चे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. वास्तविक मोनिका रिअल लाईफमध्ये बावरीसारखी दिसत नाही. तर ती खूपच स्टायलिस दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या मोनिकाच्या ग्लॅमरस फोटोंनी या मालिकेतील 'बबीता' ला मागे टाकले आहे.

मोनिका भदोरिया फिटनेस बाबतात ही सजग असते. ती दररोज जिममध्ये व्यायाम करते. याशिवाय तिने आपला आहारावर देखील नियंत्रण ठेवल्याचे समजते.

मोनिका अभिनेत्रीव्यतिरिक्त एक चांगली चित्रकार देखील आहे. तिने अनेक वेळा स्वत:ची चित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. नुकतेच तिने चाहत्यांसाठी गौतम बुद्धांचे एक वॉल पेंटिंग बनवून सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहून बावरी अर्थात मोनिका कशातच कमी नसल्याचे समजते आहे.

याशिवाय मोनिका आपला खूप सारा वेळ कुटुंबासोबत घालवत असते. खास करून मोनिका तिच्या आजीशी खूपच क्लोज आहे. कारण अलिकडेच मोनिकाने आपल्या आजीला मसाज करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. तो खूपच व्हायरल झाला होता.

मोनिका भदोरिया मूळची मध्य प्रदेशमधील आहे. तेथून ती आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT