filmmaker M M Baig found dead in th house  
मनोरंजन

filmmaker M M Baig found dead | चित्रपट निर्मात्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत, तीव्र दुर्गंध आल्याने पोलिसांना तोडावा लागला दरवाजा

बालकलाकार बेबी गुड्डूचे वडील, चित्रपट निर्माते एम एम बेग यांचा मृतदेह आढळला सडलेल्या अवस्थेत

स्वालिया न. शिकलगार

चित्रपट निर्माते M M Baig यांचा मृतदेह त्यांच्या घरात सडलेल्या अवस्थेत सापडला. शेजाऱ्यांना तीव्र दुर्गंध आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता मृतदेह आढळून आला.

filmmaker M M Baig found dead in the house mumbai

बालकलाकार बेबी गुड्डूचे वडील आणि दिग्गज चित्रपट निर्माते एम. एम. बेग यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मृतदेह मुंबईतील राहत्या घरात आढळला. घरातून दुर्गंध येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले.

रिपोर्टनुसार, बेग साहब मागील काही काळापासून अस्वस्थ राहत होते आणि घरात एकटे राहत होते. जेव्हा ते ४-५ दिवस घराबाहेर पडले नाही आणि शेजाऱ्यांना खूप दुर्गंध येऊ लागली, तेवहा पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोड़ला, तेव्हा त्यांचा मृतदेह सडलेलया अवस्थेत आढळला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर कुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या मुलीला कळवण्यात आले आहे.

एम. एम. बेग हे स्वभावाने शांत होते. रिपोर्ट्सनुसार, ऋतिक रोशन चित्रपट इंडस्ट्रीत डेब्यू करण्याआधी बेग साहब यांनी त्यांना अभिनयाचे प्रशिक्षण दिले होते.

बालकलाकार बेबी गुड्डूचे वडील

बेबी गुड्डू ८० आणि ९० च्या दशकातील लोकप्रिय बालकलाकार होती. जे. ओम प्रकाश, राकेश रोशन, विमल कुमार सारख्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी असिस्टेंट म्हणून काम केलं. 'आदमी खिलौना है', 'जैसी करनी वैसी भरनी', 'काला बाजार', 'किशन कन्हैया' यशस्वी चित्रपटांमध्ये त्य़ांचे योगदान आहे. नसीरुद्दीन शाह स्टारर 'मासूम गवाह' (१९९०) आणि शिल्पा शिरोडकर स्टारर 'छोटी बहू' (१९९४) चे दिग्दर्शन त्यांनी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT