‘मेरी कोम’ चित्रपटात प्रियांका चोप्राच्या प्रशिक्षकाची लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेते सुनील थापा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mary Kom actor Sunil Thapa dies
बॉलिवूड आणि प्रादेशिक चित्रपटसृष्टीसाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. ‘मेरी कोम’ या गाजलेल्या बायोपिक चित्रपटात प्रियांका चोप्राच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील थापा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहते सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
सुनील थापा हे एक अनुभवी आणि संवेदनशील अभिनेते म्हणून ओळखले जात होते. ‘मेरी कोम’ चित्रपटात त्यांनी साकारलेली प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत प्रभावी ठरली होती.
ते ६८ वर्षांचे होते. २०१४ मध्ये 'मेरी कोम' चित्रपटात त्यांनी प्रियांका चोप्राच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत काम केले होते. मीडिया रिपोर्टनुसार, सुनील यांचे शुक्रवारी सकाळी काठमांडूमध्ये येथे निधन झाले. थापाथली येथील नॉर्विक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. सुनील य़ांना बेशुद्धावस्थेत आणण्यात आले होते आणि सकाळी ७:४४ वाजता ईसीजी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकीर्द
नेपाळी प्रेक्षकांमध्ये ते राते काइला नावाने ओळखले जायचे. देव आनंद यांनी त्यांना हिंदी सिनेमामध्ये काम करण्याची संधी दिली होती. सुनील थापा यांनी १९८१ मध्ये 'एक दूजे के लिए' चित्रपटातून डेब्यू केला होता. चित्रपटामध्ये त्यांच्या सोबत कमल हासन आणि रति अग्निहोत्री मुख्य भूमिकेत होते.
'मशाल' या नेपाळी सिनेमा (१९८२) मध्ये त्यांनी पाऊल ठेवले. पुढे 'चिनो'मध्ये त्यांनी राते काइला नावाचे खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यातून ते प्रसिद्ध झाले होते. 'चिनो'ला नेपाळी सिनेमाचा 'शोले' म्हटले जाते.
सुनील थापा यांच्या विषयी ...
नेपाळमधील दांग येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी ३०० हून अधिक नेपाळी चित्रपटांमध्ये काम केले अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी, सुनील यांनी १९७० च्या दशकात मुंबईत मॉडेल काम केले होते. अनेक चित्रपट केल्यानंतर २०१४ मध्ये बॉलिवूड बायोपिक 'मेरी कोम' चित्रपटात त्यांनी प्रशिक्षक नरजित सिंग यांची भूमिका साकारली होती.
चित्रपटात एक कडक प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्यांनी वाहव्वा मिळवली होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, प्रशिक्षकाची भूमिका आधी अमिताभ बच्चन, डॅनी यांना ऑफर झाली होती. पण नंतर ही भूमिका त्यांना मिळाली. 'मेरी कॉम'साठी त्यांना फिल्मफेयर बेस्ट ॲक्टर इन सपोर्टिंग रोलसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.