Nupur Shikhare and Pritam Shikhare Instagram Video goes viral  Instagram
मनोरंजन

Marathi Row | मराठी हिंदी वादात आमिरच्या जावयाची उडी, व्हिडिओ एकदा बघाच

Marathi Row Nupur Shikhare | 'किती फालतू गोष्ट आपण बाळगतोय, एकदा मी पणा विकून पाहा', नुपूर शिखरेचा 'तो' व्हिडिओ व्हायरल होत आहे

स्वालिया न. शिकलगार

Nupur Shikhare and Pritam Shikhare Instagram Video goes viral

मुंबई - आमिर खानचा जावई आणि जिम ट्रेनर नुपूर शिखरेचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. नुपूरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रावर अपलोड केला असून त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. नुपूर शिखरेने आई प्रीतम शिखरेसोबत व्हिडिओ केला असून या व्हिडिओतून खूप चांगला संदेश दिला आहे. भाषेवरून माणसामाणसात चाललेला वाद कसा मिटवता आला पाहिजे, मराठी हिंदी वादात आपण कसे मागे जातोय, हा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे. पु. ल. यांच्या काही सुंदर ओळी इन्स्टाग्राम व्हिडिओ कॅप्शनला त्याने पोस्ट केल्या आहेत, जेणेकरून त्या व्हिडिओचा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचावा. शिवाय Spread love म्हणत रेड हार्ट इमोजी शेअर केलीय. नेमकं व्हिडिओमध्ये काय आहे पाहाच.

काय आहे नुपूर शिखरेच्या व्हिडिओमध्ये?

नुपूर म्हणतो- अरे मराठीमध्ये बोल, तू मराठीत बोल. तू इकडे राहतो की नाही. तू आला ना राहायला इकडे. मग तू मराठीत बोलायला पहिजे. चल जा तुझ्या गावाला, तिकडे जाऊन काम कर. चल तुझे पैसे देत नाही, चल..

नुपूरची आई म्हणते- काय झालं रे नुपूर?

नुपूर म्हणतो - काय नाही गं, तो मराठीत बोलत नव्हता. झाडलं त्याला मी.

आई म्हणते- अरे, तुला तो उलटं-सुलटं बोलला का? नसेल येत त्याला मराठी. आणि कोविडमध्ये हिच लोक तुम्हाला मदत करत होती की नाही. आणि पैसे वगैरे द्यायचे नाहीत, असं काही करू नकोस.. जा त्याला ५३ रुपये देऊन ये.

नुपूर म्हणतो-त्रेपन्न म्हणजे थर्टी सेव्हनना?

आई म्हणते-बावळट.

या व्हिडिओच्या मागे मी असा कसा असा कसा वेगळा हे गाणे वाजताना दिसते.

नुपूर शिखरे काय म्हणाला?

कॉमेंट बॉक्समध्ये नुपूर म्हणाला, ''हा विनोद मी स्वतः वर केलेला आहे. मला स्वतः ला धड आकडे कळत नाहीत आणि मीच लोकांना शिकवायला गेलो. रील पूर्ण पहावी.'' यानंतर संमिश्र कॉमेंट्सचा पाऊस पडलाय. काहींनी नुपूरचे समर्थन केलं आहे तर काहींनी सडेतोड प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले सोशल मीडिया युजर्स

एका युजरने लिहिलंय- नुपूर.. आता परप्रांतीयांच्या माजुर्डेपणावर पण एक reel बनव.. मराठी येत नाही ह्याच्यापेक्षा मोठा प्रश्न त्याची अरेरावी आहे.. आणि जर एखादा प्रदेश तुम्हाला नोकरी देत असेल तर त्यांची भाषा शिकण्यात आणि त्यांनी शिकावी हा अट्टाहास धरण्यात काही चूक आहे का?

आणखी एकाने म्हटलंय- "मे सिख रहा हुं मराठी" येवढं स बोलायला जड जात का यांना?? उलट उत्तर देतात की नही सिखूंगा मराठी , जर असं हिंदी भाषेचा महाराष्ट्रात माज करू शकतात तर आपण महाराष्ट्रात राहून मराठीचा माज का नाही करायचा ??

दुसऱ्या सोशल मीडिया युजरने लिहिलंय-जर मी कामानिम्मीत युपी बिहार ला गेलो आणि मी मराठी मध्ये बोललो तर ते उत्तर देतील का? तेव्हा मलाच हिंदी बोलावी लागेल ना कारण मी त्यांच्या राज्यात गेलो आहे. मग आत्ता जर ते महाराष्ट्रात आलेत तर मराठी शिकायला काय हरकत आहे.

तिसऱ्या युजरने म्हटलंय-एक महाराष्ट्र राज्य ..ज्या राज्यात बाहेरची लोक येऊन व्यवसाय..नोकरी करतात..आपलं पोट भारतात..पैसे कमवतात..मोठी होतात...संपूर्ण आयुष्य घालवतात...तर त्या राज्याची संस्कृती..भाषा आदर जर केला तर काय वाईट आहे ..आता आम्ही गुजरात ला जाऊन मराठी बोलुन् धंदा करायचा म्हणला तर होईल का...मग आमच्या राज्यात् येऊन तुम्ही तोडकी मोदकी का.असेना मराठी बोला ना ...त्यात काय गैर आहे ..मराठी ही भाषा नसून ही महाराष्ट्रची ओळख आहे ..येणारी पिढी कदाचित मराठी बोलणार पण नाही कारण आजूबाजूला इतकी हिंदी बोलणारे झाले आहेत.तेव्हा आपण मराठी बोला ..व गैर मराठी सोबत मराठीतच संभाषण करा...आपण आली भाषा सांभाळायची नाईतर कोण सांभाळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT