Kranti Redkar Movie Maitreyaa Pudhari photo
मनोरंजन

Kranti Redkar Movie|'काकण'नंतर क्रांती रेडकरचा नवा चित्रपट 'मैत्रेया' जाहीर; फ्रेंडशिप डे निमित्त पोस्टर रिलीज

Kranti Redkar Movie Maitreyaa | 'काकण'नंतर क्रांती रेडकरचा नवा चित्रपट 'मैत्रेया' जाहीर; फ्रेंडशिप डे निमित्त पोस्टर रिलीज

पुढारी वृत्तसेवा

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने क्रांती रेडकर यांनी त्यांच्या नव्या मराठी चित्रपट 'मैत्रेया'ची घोषणा केली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून मैत्री, नातेसंबंध आणि आयुष्यातील भावनिक प्रवासावर आधारित ही कथा असल्याचे संकेत मिळाले आहेत. पोस्टरनंतर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने समर टाईम्स प्रोडक्शन निर्मित, क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित ‘मैत्रेया’ची घोषणा करण्यात आलीय. लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांची ही नवी कलाकृती मैत्रीच्या भावविश्वाला स्पर्श करणारी असल्याचे पोस्टरवरून दिसते.

प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीला एक वेगळं स्थान असतं. काही मित्र काळाच्या ओघात दूर जातात, काही नाती नव्याने उमलतात, तर काही आठवणी आयुष्यभर मनात जिवंत राहतात. अशाच भावनिक नात्यांचा वेध घेणारी कथा ‘मैत्रेया’च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येणार आहे.

‘काकण’सारख्या संवेदनशील चित्रपटानंतर क्रांती रेडकर वानखेडे पुन्हा एकदा वेगळ्या आशयाचा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. या चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली असून, समर टाईम्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला जात आहे.

प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये समर, आयुषी, स्काय आणि रुची या चार प्रमुख पात्रांची झलक पाहायला मिळते. या चौघांच्या आयुष्यातील नातेसंबंध आणि त्यांच्या मैत्रीचा प्रवास नेमका कसा उलगडणार, याबाबत मात्र निर्मात्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

चित्रपटाविषयी बोलताना क्रांती रेडकर वानखेडे म्हणाली, 'मैत्रेया’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातील त्या मैत्रीची गोष्ट आहे, जी काळ बदलला तरी मनात कायम राहाते. या चित्रपटातून मैत्रीचे अनेक रंग, नात्यांची गुंतागुंत आणि आयुष्याची अनपेक्षित वळणं अनुभवायला मिळतील. ‘काकण’नंतर पुन्हा एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर आणताना खूप आनंद होत आहे. ‘मैत्रेया’चा हा प्रवास लवकरच प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT